Diwali Faral Tips : चिवडा नरम पडतोय? या टीप्स वापरा, राहिल एकदम कुरकुरीत

How To Make Perfeact Chivda : फराळ बनवताना सर्वात मोठं आव्हान असतं की तो साठवून ठेवणे. त्यातही फराळ नरम पडायला नको
chivda-Diwali Faral Tips
chivda-Diwali Faral Tipschivda-Saam tv
Published On

Kurkurit Chivda:

दिवाळीची तयारी घराघरात सुरू झाली आहे. फराळाला करण्यास सुरूवात झाली आहे. घरात रोज एक एक पदार्थ बनवला जातो. परंतु पदार्थ बनवताना नेहमी काही न काही चुका होतात. कधी चिवडा नरम पडतो. तर कधी चकल्या कुरकुरीत होत नाही.

फराळ बनवताना सर्वात मोठं आव्हान असतं की तो साठवून ठेवणे. त्यातही फराळ नरम पडायला नको. खुसखुशीतच असायला हवा. त्यासाठी अनेक उपाय आहेत. अशाच काही ट्रीक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

chivda-Diwali Faral Tips
Rava Ladoo Recipe : रव्याचा लाडू वळवताना फुटतो, प्रमाणही चुकते; परफेक्ट कृती पाहाच, झटपट बनतील

1. चिवडा नरम न पडण्यासाठी ट्रीक्स

  • चिवडा बनवताना जर पोहे मऊ पडण्याची भीती असेल तर त्याला उन्हात ठेवून कडक करुन घ्यावेत.

  • जर ऊन नसेल तर मायक्रोव्हेव किंवा कढईत चांगले परतून परतून घ्या. यामुळे चिवडा शेवटपर्यंत कुरकुरीत राहिल.

  • चिवड्यात तुम्ही कोथिंबीर (coriander), कढीपत्ता घालत असाल तो धुवून चांगला कोरडा करुन घ्या. जेणेकरुन चिवड्यावर त्याचा फार परिणाम होणार नाही.

  • चिवडा तयार झाल्यावर गरम डब्यात भरू नका. वाफेच्या ओलाव्यामुळे चिवडा नरम होऊ शकतो.

  • चिवड्यात नेहमी हळदीची (Turmeric) फोडणी शेवटी घालावी. जेणेकरुन रंग व्यवस्थित येईल.

chivda-Diwali Faral Tips
Diwali Fashion: जुन्या साडीला द्या नव्याची जोड! दिवाळीत होईल तुमच्या स्टाईलची चर्चा, असा लूक करा

2. पोह्यांचा चिवडा रेसिपी

  • सर्वप्रथम कढईत पोहे मंद आचेवर भाजून घ्या. त्यानंतर मोठ्या पातेल्यात काढून घ्या.

  • त्यानंतर कढईत तेल टाका. तेल गरम जाल्यावर त्यात काजू, खोबऱ्याचे काप भाजून घ्या. खोबरे बाजून झाल्यावर शेंगदाणे भाजून घ्या.

  • त्यानंतर तेलात मोहरीची फोडणी घ्यावी. फोडणी झाल्यावर त्यात कढीपत्ता, हळद, लसूण (Garlic), हिरव्या मिरच्या टाका.

  • यानंतर ही फोडणी पोह्यांवर टाका. त्यानंतर त्यावर खोबऱ्याचे काप, शेंगदाणे, काजू टाका. त्यात चवीनुसार मीठ टाकून संपूर्ण पोहे हलक्या हाताने मिश्र हलवून घ्या. यानंतर तुमचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com