Karanji Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि खुसखुशीत करंजी; पाहा रेसिपी

Diwali Faral Recipe : दिवाळीला काही दिवस उरले असून घराघरात फराळ बनवण्यास सुरूवात झाली आहे.
Karanji Recipe in Marathi
Karanji Recipe in MarathiDiwali Faral - Karanji - Saam Tv
Published On

Diwali Special Karanji Recipe:

दिवाळीला (Diwali) अवघे काही दिवस उरले असून घराघरात सजावट, फराळाची तयारी सुरू झाली आहे. दिवाळी म्हटल्यावर शंकरपाळ्या, चकल्या, लाडू, अनारसे असे सर्व पदार्थ तयार केले जातात. यात सर्वात चविष्ट पदार्थ म्हणजे करंजी.

चविष्ट सारण असलेल्या खुसखुशीत करंज्या सर्वांनाच आवडतात. करंज्या या वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या पद्धतीने तयार केल्या जातात. करंजी बनवताना विशेषत तळताना काळजी घ्यायची असते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने चविष्ट कशी बनवायची ते सांगणार आहोत. पाहा रेसिपी

साहित्य

  • ३ वाटी किसलेले खोबरे

  • ३ वाटी बारीक रवा

  • पिठी साखर

  • २ टीपस्पून वेलची पावडर

  • काजू

  • बदाम

  • मनुका

  • तूप

  • अर्धा किलो मैदा

  • आवश्यकतेनुसार मीठ

  • पाणी

  • तेल

Karanji Recipe in Marathi
Gold Silver Price Today (3rd November): सोन्याचे दर गगनाला, चांदीची चकाकी उतरली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

कृती

  • सर्वप्रथम कढईत सुके खोबरे भाजून घ्या. त्यानंतर खोबरे काढून त्यात कढईत रवा भाजून घ्या.

  • रवा भाजून झाल्यावर थोडे तबप घाला. त्यात सुका मेवा भाजून घ्या. सर्व मिश्रण एकत्रितपणे ताटात काढून घ्या.

  • मिश्रणात पीठी साखर, वेलची पूड घाला. मिश्रण एकत्र करा.

  • त्यानंतर एका ताटात मैदा चाळून घ्या. त्यात ४ चमचे गरम तूप टाका. एकत्रितपणे मिक्स करुन घ्या. त्यानंतर मैद्यात पाणी टाकून मळून घ्या. या पीठावर अर्धा तास झाकण ठेवा.

  • अर्ध्या तासानंतर पीठ मळून घ्या. त्यानंतर लहान आकाराच्या पोळ्या लाटून घ्या. त्यात सारण टाकून एका बाजून पाणी लावून करंजी कापून घ्या. यासाठी तुम्ही करंजी बनवण्याचा साचा वापरु शकता.

Karanji Recipe in Marathi
Cancer Causes: चिंताजनक! कॅन्सरची टेन्शन वाढवणारी आकडेवारी, भविष्यातील धोका कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com