Cancer Causes: चिंताजनक! कॅन्सरची टेन्शन वाढवणारी आकडेवारी, भविष्यातील धोका कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू

Cancer Patients : गेल्या काही वर्षांपासून भारतात कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे.
Indian Cancer Congress 2023
Indian Cancer Congress 2023Saam Tv
Published On

Indian Cancer Congress 2023:

गेल्या काही वर्षांपासून भारतात कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. लोकसंख्या वाढीमुळे आणि वेळेवर निदान होत असल्याने रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे त्यावर वेळीच उपचार करणे हे महत्त्वाचे आहे. कर्करोगासंबंधित उपाययोजनेसाठी इंडियन कॅन्सर क्रॉंग्रेस दर चार वर्षांनी एक कार्यक्रम आखते. यंदा २ नोव्हेंबर रोजी बीकेसी येथे या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

गुरुवारी बीकेसी येथे इंडियन कॅन्सर क्रॉंग्रेसच्या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी चिंताजनक परिस्थिती निदर्शनास आली. दर चार वर्षांनी हा कार्यक्रम आखला जातो. या वर्षी ऑन्कोलॉजी क्षेत्रातील एकूण ५००० हून अधिक प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी, वाढत्या रुग्णसंख्येला लक्षात घेता वैद्यकीय सुविधा आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले.

दरवर्षी तब्बल १४ लाख कॅन्सरची नवीन रुग्ण आढळून येत आहे. तर ही संख्या २०४० पर्यंत २० लाख होण्याची शक्यता आहे. असा अंदाज वर्तवला जात आहे.

Indian Cancer Congress 2023
विद्यार्थ्यांनो, अभ्यासाला लागा! JEE Main 2024 परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात, कसे कराल अप्लाय?

कार्यक्रमातून कर्करोग रुग्णांची संख्या समोर आली आहे. भारतात सर्वात जास्त कर्करोगाच्ये जास्त प्रमाण ईशान्येकडील राज्यात आहे. मिझोरामची राजधानी आयझॉल मध्ये पुरुषांमध्ये कर्करोगाची सर्वाधिक रुग्णसंख्या आगे. दर वर्षी १ लाख लोकसंख्योमागे २.६९.४ लोकांना कर्करोगाची नोंद केली जात आहे.

अरुणाचल प्रदेशातील पापुमपारे जिल्ह्यात महिलांमध्ये सर्वात जास्त कर्करोगाचे प्रमाण आहे. तसेच मोठ्या महानगरांमध्येही कर्करोगाचे रुग्णांची संख्या १ लाखांमागे १००-११० आहे. उदाहरणार्थ, मुंबईतील पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण १ लाखांमागे १०८ आहे. तर महिलांमध्ये ११६ आहे.

Indian Cancer Congress 2023
HDFC vs ICICI Bank: दिवाळीच्या बोनसमधील पैसे उरलेत? FD मध्ये करा गुंतवणूक मिळेल चांगला परतावा, या बँका देतायत अधिक व्याजदर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com