Sugar Factory Scheme: ऊस मिळवण्यासाठी बक्षीस योजना; पंढरपुरातील साखर कारखानदाराने केले जाहीर

Pandharpur News : ऊस मिळवण्यासाठी बक्षीस योजना; पंढरपुरातील साखर कारखानदाराने केले जाहीर
Pandharpur Sugar Factory
Pandharpur Sugar FactorySaam tv

पंढरपूर : पंढरपूरच्या गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने जास्तीचा ऊस मिळवण्यासाठी ऊस उत्पादक (Farmer) शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहानपर बक्षीस योजना जाहीर केली आहे. योजनेमुळे (Sugarcane) ऊस उत्पादक शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना जाहीर करणारा जिल्ह्यातील विठ्ठल कारखाना पहिला ठरला आहे. (Tajya Batmya)

Pandharpur Sugar Factory
Onion Theft: चोरट्यांचा कांद्यावर डल्ला; शेडमधून ८५ कांदा गोण्यांची चोरी

सोलापूर जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने ऊस उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अधिकचा ऊस मिळवण्यासाठी सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊस दराची स्पर्धा सुरू झाली आहे. राज्यात सर्वाधिक ऊस गाळप करणाऱ्या टेंभूर्णी येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने (Sugar Factory) आधीच हजार रुपये दर जाहीर करुन कोंडी फोडली होती. त्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ५५० रुपये दर जाहीर केली आहे. सोबतच शंभर टनाहून अधिक ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना केली आहे. त्यानंतर भीमा सहकारी कारखान्याने २ हजार ४०० रूपयांच्या  एफआरपी पेक्षा १२५ रूपये दर जाहीर केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pandharpur Sugar Factory
Hingoli News: माल खरेदी करून शेतकऱ्यांना दिले बोगस धनादेश; वसमत बाजार समितीत अकरा शेतकऱ्यांची फसवणूक

अशी आहे योजना 

यंदा कारखान्यांचा गाळप हंगाम जेमतेम शंभर दिवस चालेल असा अंदाज आहे. त्यामुळे सर्वच कारखान्यांना चांगला ऊस मिळवण्यासाठी ऊस दराची स्पर्धा सुरू झाली. (Pandharpur) पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याने शंभर टन ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याला प्रती टन दहा रूपये, अडीचशे टनासाठी पंधरा रूपये, पाचशे टनासाठी २५ तर एक हजार टनासाठी ५० रूपये बक्षीस म्हणून अधिकचे देण्यात येणार आहेत. कारखान्याने जाहीर केलेल्या बक्षीस योजनेचे तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. बक्षीस योजनेचा कारखान्याला ऊस मिळवण्यासाठी चांगला‌ फायदा होईल; असे कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com