Weight loss vs Fat Loss: वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये फरक काय? वजन कमी करण्याच्या नादात या चुका करु नका, अन्यथा...

Difference between weight loss and fat loss exercise : फॅट लॉस आणि वेट लॉसमध्ये फरक काय? वेट लॉस करुन फॅट कसे जपाल?
Weight loss vs Fat Loss
Weight loss vs Fat LossSaam Tv
Published On

Healthy Weight Loss :

आजच्या काळात लठ्ठपणा ही सगळ्यात मोठी समस्या बनत चालली आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे लठ्ठपणासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. ऑफिसमध्ये किंवा एकाच ठिकाणी बसून राहिल्याने शरीरात चरबी जमा होते.

हल्ली वाढत्या वयामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी अनेक महागड्या उत्पादनासोबतच जीमचा पर्याय देखील निवडतो. परंतु, वाढतं जाणारे वजन हे वेट लॉस आहे की, फॅट लॉस हे आपल्याला कळतं नाही. वजन कमी करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हवे हे जाणून घेऊया.

Weight loss vs Fat Loss
Causes Weight Gain In Females: महिलांच वजन का वाढतं? ७ कारणे, वाढते वजन अन् होणारा त्रास असा‌ करा कमी

1. वजन कमी करणे म्हणजे काय?

हल्ली वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट आणि ग्लूटेन फ्री डाएटद्वारे (Diet) शरीराचे वजन कमी करण्याचा ट्रेंड आहे. परंतु असे केल्याने वजनासोबतच शरीराला आवश्यक असलेले स्नायूही कमी होतात, जे शरीराला बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच, जर तुम्हाला स्लिम आणि टोन्ड बॉडी हवी असेल तर यासाठी तुम्ही वजन कमी करू नका तर चरबी देखील कमी करा.

2. फॅट लॉस आणि वेट लॉसमध्ये फरक काय?

वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बहुतेक गोष्टी या मशीन्सवर अवलंबून असतात. परंतु, वजन कमी करताना फक्त वजनांवर नाही तर फॅटवर देखील लक्ष ठेवा. चरबी कमी करण्यासोबतच आपण आपले स्नायू कमकुवत करतो. ज्यामुळे शरीराला नुकसान होते.

Weight loss vs Fat Loss
Bhiwandi One Day Trip: ठाणे जिल्ह्यातील भिंवडीतही आहेत फिरण्याची ठिकाणे; वन डे ट्रिप होईल अविस्मरणीय

3. वेट लॉस करुन फॅट कसे जपाल?

1. भरपूर प्रथिने खा

प्रथिने (Protein) हे आपल्या शरीरासाठी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे. स्नायू टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याच्या वाढीसाठी आहारात प्रथिनांचा समावेश करा

2. व्यायाम

शरीरातील चरबी कमी करण्यासाठी व्यायाम हा सर्वात सोपा मार्ग आहे. लठ्ठ लोक आहारात कमी कॅलरीजचा समावेश करतात. आठवड्यातून किमान तीन वेळा कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग करतात ते स्नायू टिकवून ठेवतात.

Weight loss vs Fat Loss
Marriage Numerology: या दिवशी जन्मलेल्या मुली असतात बेस्ट वाईफ, तुम्ही देखील यात आहात का?

3. कमी कॅलरी आहार घ्या

वजन कमी करण्यासाठी, तुम्हाला कॅलरीज कमी कराव्या लागतील. कमी कॅलरी वापरून आणि व्यायाम करून तुम्ही वजन कमी करू शकता. कॅलरी खूपच कमी केल्याने चरबीऐवजी स्नायूंचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात अधिक फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिनेयुक्त पदार्थ, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि कमी साखरयुक्त पदार्थ आणि पेये यांचा समावेश करून अतिरिक्त कॅलरीज कमी करू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com