Diabetes Symptoms: डोळ्यांमध्ये दिसायला लागलेत 'हे' बदल? डायबिटीजचा इशारा असू शकतो, चुकूनही दुर्लक्ष करू नका

Diabetes Symptoms: डोळ्यांसमोर धुसर दिसणे, काळे डाग किंवा प्रकाशाचे फ्लॅश जाणवणे ही मधुमेहाशी संबंधित लक्षणे असू शकतात. अशी चिन्हे दिसल्यास वेळ न दवडता नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Diabetes Symptoms
Diabetes SymptomsSaam Tv
Published On

Diabetes Symptoms: डायबिटीज हा शरीरातील रक्तातील साखरेशी संबंधित आजार असला, तरी त्याचा परिणाम डोळ्यांवरही होऊ शकतो. विशेष म्हणजे, काही वेळा रक्तातील साखरेची पातळी वाढल्याचा परिणाम डोळ्यांवर जाणवू शकतो. त्यामुळे डोळ्यांमध्ये अचानक किंवा वारंवार होणारे बदल दुर्लक्षित न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

दृष्टी धुसर होणे

डोळ्यांसमोरची दृष्टी अचानक धुसर होणे हे रक्तातील साखरेच्या वाढलेल्या पातळीशी संबंधित असू शकते. रक्तातील ग्लुकोजमध्ये होणाऱ्या बदलांमुळे डोळ्यातील लेन्सवर परिणाम होऊन फोकस करण्यात अडचण येऊ शकते. रक्तातील साखर नियंत्रणात आल्यानंतर काही वेळा ही धुसर दृष्टी सुधारू शकते.कधी स्पष्ट तर कधी धुसर दिसणे, चष्म्याचा नंबर वारंवार बदलल्यासारखे वाटणे किंवा जवळच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, हे देखील काळजीचे लक्षण आहे. मात्र, अशा लक्षणांमागे इतर कारणेही असू शकतात.

Diabetes Symptoms
Bigg Boss 20: सलमान खानला 'या' स्पर्धकावर भडकला; पहिल्या वीकेंड वारमध्ये काढणार खरडपट्टी

डोळ्यांसमोर काळे डाग किंवा तरंग दिसणे

डोळ्यांसमोर काळे डाग, ठिपके किंवा तरंगणाऱ्या रेषा दिसणे याला ‘फ्लोटर्स’ म्हटले जाते. डायबिटीजमुळे डोळ्याच्या मागील भागातील रेटिनामधील रक्तवाहिन्यांना नुकसान होऊन डायबेटिक रेटिनोपॅथी होऊ शकते. या स्थितीत असे बदल दिसू शकतात.प्रकाशाचे फ्लॅश दिसणे, दृष्टीच्या काही भागात काळी किंवा रिकामी जागा जाणवणे, रंग ओळखण्यात अडचण येणे किंवा दृष्टी कमी होणे हीदेखील संभाव्य लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Diabetes Symptoms
Hruta Durgule: बाप्पाच्या भक्तीत रंगली अभिनेत्री ऋता दुर्गुळे; 'गणेश वंदना' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

सुरुवातीला लक्षणे दिसतीलच असे नाही

डायबिटीजशी संबंधित डोळ्यांच्या आजारांची सुरुवात अनेकदा कोणत्याही स्पष्ट लक्षणांशिवाय होऊ शकते. त्यामुळे डोळे व्यवस्थित वाटत असली तरी डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी नियमित डोळ्यांची तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. डायलेटेड आय टेस्टद्वारे रेटिनामधील बदल लवकर ओळखता येतात.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com