Heart Attack Risk: डायबेटीज, बीपी आणि इन्फेक्शनमुळं वाढतो हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञांनी नेमक्या कोणत्या गोष्टी सांगितल्या?

Diabetes and Heart: डायबेटीज, हाय बीपी आणि संसर्गजन्य आजार हृदयावर गंभीर परिणाम करतात. सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळेवर उपचार केल्यास हार्ट अटॅकचा धोका टाळता येतो.
high blood pressure heart disease
diabetes heart attack risk
Published On

बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयींनी आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यात तुम्हाला डायबेटीज, हाय ब्लड प्रेशरसारख्या समस्या असतील तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो असे हार्ट स्पेशलिस्ट तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पुढे आपण अशीच सामान्य वाटणारी पण गंभीर लक्षणे जाणून घेणार आहोत.

तज्ज्ञ म्हणतात, कोणताही आजार होण्यापुर्वी शरीर आपल्याला अनेक संकेत देत असतं. बऱ्याचदा छातीत हलकी जडजड वाटते, जिने चढताना, उतरताना लागणारा खूप दम किंवा थकवा येतो. लोक याकडे लगेचच दुर्लक्षित करतात. मात्र हीच लक्षणे हार्ट अटॅकच्या सुरुवातीची असतात.

high blood pressure heart disease
Mobile Battery Saving Tips: ...म्हणून तुमच्या मोबाइलची बॅटरी खटाखट उतरतेय, आताच ही सेटिंग बदला

मणिपाल हॉस्पिटल, भुवनेश्वर येथील वरिष्ठ हृदय व चेस्ट शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. जितेंद्रनाथ पटनाईक सांगतात की, हाय ब्लड प्रेशर, डायबेटीज, संसर्गजन्य आजार हे वेगवेगळे नाही तर एकत्र हृदयावर गंभीर परिणाम करतात. ही तिन्ही कारणं मिळून हृदयावर प्रचंड ताण निर्माण करतात आणि कधी कधी अचानक हार्ट अटॅक होण्याचा धोका निर्माण होतो.

हाय ब्लड प्रेशरला 'सायलेंट किलर' असं म्हटलं जातं. सतत वाढलेल्या दाबाविरुद्ध रक्त पंप करताना हृदयाच्या स्नायूंवर खूप जोर पडतो. यामुळे हृदय जाड आणि कडक होतं. बाहेरून मजबूत दिसणारं हे हृदय आतून मात्र नीट कार्य करू शकत नाही. मग हळूहळू हृदयाची रक्त साठवण्याची आणि पंप करण्याची क्षमता कमी होते आणि अचानक हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो. यामध्ये तुम्हाला कोणतीही विशिष्ट लक्षणं जाणवत नाहीत.

जेव्हा डायबेटीज वाढते, तेव्हा रक्तवाहिन्यांना इजा पोहोचवत असते. तसेच प्लॅक नकळत साचत असतो. याचसोबत ते थेट हृदयाच्या पेशींनाही नुकसान पोहोचवतं. यामुळे डायबेटिज कार्डिओमायोपॅथी निर्माण होऊ शकते. त्यामध्ये कोरोनरी आर्टरी आजार नसता हृदय कमकुवत होतं आणि अचानक हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

high blood pressure heart disease
हाता-पायाला सतत मुंग्या येतात? असू शकते 'या' Vitamin कमतरता, आताच करा आहारात 'हा' बदल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com