Dhapate Recipe: नाश्त्याला बनवा पौष्टिक आणि स्वादिष्ट धपाटे; वाचा सिंपल रेसिपी

Dhapate Recipe in Marathi: आपण आज गावाकडे जास्त प्रमाणात बनवले जाणाऱ्या धपाट्यांची रेसिपी जाणून घेणार आहोत. धपाटे विविध धान्य आणि डाळीपासून बनवले जातात. धपाटे आरोग्यासाठी फार पौष्टिक असतात.
Dhapate Recipe: नाश्त्याला बनवा पौष्टिक आणि स्वादिष्ट धपाटे; वाचा सिंपल रेसिपी
Dhapate RecipeSaam TV

दररोज नाश्त्याला काय बनवावे असा प्रश्न गृहिणींना पडतो. त्यासाठी अनेक महिला विविध रेसिपीचे पुस्तक वाचतात, तर काही जणी टीव्हीवरील रेसिपीचे शो पाहून त्यातून शिकत असतात. आता तुम्ही नवीनच स्वयंपाक करण्यास सुरुवात केली असेल तर आम्ही तुमच्यासाठी नाश्त्याला झटपट बनेल अशी एक अनोखी रेसिपी आणली आहे. या रेसिपीमधून तुम्ही झटपट 10 मिनिटांत टेस्टी नाश्ता बनवून तुमच्या कुटुंबीयांना देऊ शकता.

Dhapate Recipe: नाश्त्याला बनवा पौष्टिक आणि स्वादिष्ट धपाटे; वाचा सिंपल रेसिपी
Pure Ghee Recipe: दुकानातलं भेसळयुक्त तूप खाण्यापेक्षा घरच्याघरी बनवा शुद्ध तूप; वाचा गावरान रेसिपी

आपण आज गावाकडे जास्त प्रमाणात बनवल्या जाणाऱ्या धपाट्यांची रेसिपी जाणून घेणार आहोत. धपाटे विविध धान्य आणि डाळीपासून बनवले जातात. धपाटे आरोग्यासाठी फार पौष्टिक असतात. तसेच हे बनवणे देखील फार सोपे आहे.

साहित्य

  • गहू

  • ज्वारी

  • बाजरी

  • नाचणी

  • सोयाबीन

  • हरभरे

  • धने

  • बडीशेप

  • जिरे

  • ओवा

हे सर्व साहित्य भाजून चक्कीवरून बारीक दळून घ्या. अगदी बारीक पीठ याचे तयार करून घ्या. तयार पीठ तुम्ही अगदी महिनाभर देखील घरात ठेवू शकता. तसेच या पिठापासून झटपट धपाटे बनवू शकता.

धपाटे बनवताना लागणारे साहित्य

  • पीठ

  • अद्रक लसूण पेस्ट

  • मीठ

  • लाल तिखट किंवा मिरची

  • तेल

  • कृती

पीठ आणि सर्व मिश्रण एकत्र करून त्याचा गोळा बनवून घ्या.

धपाटे गरम तव्यावर भाजावे लागतात. त्यासाठी गॅसवर तवा तपण्याठी ठेवा. त्यानंतर एक सुटी सफेद रंगाचे कापड घ्या. या कापडावर पाणी लावा. त्यानंतर पिठाचा थोडा गोळा घेऊन पाण्याच्या साहाय्याने संपूर्ण रुमालावर पसरवून घ्या.

तयार धपाटा छान भाजावा यासाठी त्यावर काही खड्डे करून घा. त्यानंतर रुमालासकट धपाटा तव्यावर टाका. पाण्याचा हात लावून रुमाल काढून घ्या.

Dhapate Recipe: नाश्त्याला बनवा पौष्टिक आणि स्वादिष्ट धपाटे; वाचा सिंपल रेसिपी
Murmurre Appe Reciepe : नाश्त्याला बनवा हेल्दी मुरमुरे अप्पे; जाणून घ्या रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com