Dev Diwali: यंदा देव दिवाळी कधी? पूजेचा शूभ मूहूर्त किती वाजता? वाचा सविस्तर

Dev Diwali 2025 Date Significance and Shubh Muhurt: देव दिवाळी यंदा ५ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. देव दिवाळीचा शूभ मूहूर्त कधी आणि पूजा कधी करतात ते जाणून घ्या.
Dev Diwali
Dev DiwaliSaam Tv
Published On
Summary

यंदा देव दिवाळी कधी?

देव दिवाळीची पूजा कधी करावी?

देव दिवाळीला काय करतात?

दिवाळीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व असते. दिवाळी संपल्यानंतर लगेचच देव दीपावली असते. देव दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. देव दिवाळी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पोर्णिमेला साजरी केली जाते.दिवाळी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते. त्यानंतर बरोबर १५ दिवसांनी कार्तिक पोर्णिमेला देव दिवाळी असते.

Dev Diwali
Post Diwali Care: दिवाळीनंतर खूप थकवा अन् चेहरा डल दिसतोय? मग हे सोपे उपाय ठरतील बेस्ट

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, देव दिवाळीच्या दिवशी भगवान शिव शंकरांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला. या दिवशी भगवान शिव शंकरांची पूजी केली जाते. या दिवशी सर्व देव-देवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि दिवे लावतात, असं सांगण्यात येते.

या वर्षी देव दिवाळी कधी? (Dev Diwali 2025 Date)

या वर्षी देव दिवाळी ५ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची मनोभावे पुजा करतात.देव दिवाळीची पूजा करण्याचा शूभ मूहूर्त जाणून घ्या.

Dev Diwali
Dev Diwali 2025: कधी आहे देव दिवाळी? जाणून घ्या मुहूर्त आणि तारीख

देव दिवाळीचा शूभ मूहूर्त (Dev Diwali Sbhubh Muhurt)

या वर्षी देव दिवाळीची पोर्णिमा तिथी ४ नोव्हेंबर रोजी १०.६ वाजता सुरु होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.४८ मिनिटांपर्यंत असेल. या दिवशी गंगा आरतीचा मूहूर्त ५.१५ रोजी सुरु होईल. हा मूहूर्त संध्याकाळी ७.५० वाजेपर्यंत असेल.

कॅलेंडरनुसार, देव दीपावलीनिमित्त एक शुभ आणि दुर्मिळ शिवास योग निर्माण होईल. हा मूहूर्त ६.४८ वाजता सुरु होईल. या शुभ शिवास योगात भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते.

देव दिवाळीवर भाद्रची सावली

या वर्षी देव दिपावलीवर भद्रा गहाची सावली आहे. या दिवशी सकाळी ८.४४ वाजता अशुभ संयोग होईल. या काळात भद्रा स्वर्गात वास करेल. त्यामुळे पृथ्वीवर कोणताही नकारात्मक प्रवास जाणवणार नाही.

डिस्क्लेमर- ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. साम टीव्ही याची पुष्टी करत नाही.

Dev Diwali
Face Care after Diwali: दिवाळीनंतर मेकअपमुळे चेहरा खराब झालाय? मग 'हा' घरगुती फेसपॅक वापरुन चेहरा होईल क्लिन आणि ग्लोईंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com