Manasvi Choudhary
दिवाळी झाल्यानंतर सर्वांना वेध लागते ते म्हणजे तुळशीचे लग्न आणि देव दिवाळीचे.
हिंदू धर्मात देव दिवाळीला विशेष महत्व आहे. देव दिवाळी आपल्याकडे मोठ्या उत्साहात साजरी केली जाे
या दिवशी देवी देवता पृथ्वीवर अवतारात आणि काशीमध्ये दिवाळी साजरी करतात असे म्हटले जाते.देव दिवाळीच्या दिवशी काशी आणि गंगेच्या घाटांवर नागरिकांची गर्दी जमा होते.
अख्यायिकेनुसार, त्रिपुरासूर राक्षस पृथ्वीवरील लोकांना त्रास द्यायचे यावेळी त्रस्त देवी देवता त्याच्याविषयीची तक्रार घेऊन महादेवाजवळ गेले.
यावेळी महादेवांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या राक्षसाचा वध केला त्याच्यापासून मुक्ती मिळाल्यानंतर सगळ्यांनी महादेवाचं देवस्थान काशी गाठली.
काशीत पोहचल्यानंतर दिपप्रज्वलन करण्यात आले तेव्हापासून आतापर्यंत देव दिवाळी उत्सव साजरा केला जातो.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दिपदान केल्याने घरात सुख- समृद्धी येते तसेच देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
यंदा ९ नोव्हेंबर २०२५ ला देव दिवाळी साजरी केली जाणार आहे.