

डेटिंग अॅपचं भयानक वास्तव
६७ टक्के युजर्स विवाहित किंवा रिलेशनशिपमध्ये
अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता
सध्या डेटिंग अॅपचा वापर खूप जास्त होतो. लाखो लोक वेगवेगळ्या प्रकारचे डेटिंग अॅप वापरतात. डेटिंग अॅपवर कोणीही कोणाशीही बोलू शकते. त्यांच्याबद्दल जाणून घेऊ शकतात. दरम्यान, आता डेटिंग अॅपबाबत एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. Pew Research Center ने केलेल्या स्टडीनुसार, डेटिंग अॅप वापरणाऱ्यांपैकी ६५ टक्के युजर्स हे विवाहित किंवा रिलेशनशिपमध्ये आहेत.
डेटिंग अॅपचा वापर हा चांगला पार्टनर शोधण्यासाठी केला जातो. डेटिंग अॅपव हजारो लोकांचे आयडी असतात. त्यातील आपल्या योग्यतेच्या मुलासोबत आपण बोलू शकतो. त्याला भेटू शकतो आणि त्यानंतर एकमेकांना डेट करायचे की नाही हा त्यांच वैयक्तिक प्रश्न असतो. दरम्यान, आता डेटिंग अॅपवर सर्वाधिक लोक हे विवाहित आणि रिलेशनशिपमध्ये असणारे आहेत. ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खरंच डेटिंग अॅप योग्य आहे का?
डेटिंग अॅपच्या या वास्तवामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. खरंच जे तरुण सिंगल आहेत ते खऱ्या प्रेमाच्या शोधात डेटिंग अॅप वापरतात का? यामुळे डेटिंग अॅप वापरताना अनेक फ्रॉड होण्याची शक्यता आहे. अनेकांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. कारण, एखादा व्यक्ती सिंगल म्हणून आपलं अकाउंट ओपन करतो. त्याच्याशी अनेकजण बोलतात. परंतु शेवटी तो व्यक्ती विवाहित किंवा रिलेशनशिपमध्ये असल्याचे समजते. यामुळे एखाद्या व्यक्तीची फसवणूक होते.
डेटिंग अॅपमुळे होऊ शकते आर्थिक फसवणूक
डेटिंग अॅपमुळे तुमचे आर्थिक नुकसानदेखील होऊ शकते. अनेकदा समोरची व्यक्ती तुमच्याकडे तुमचे बँक डिटेल्स किंवा पैसे मागू शकते. यामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. तुम्ही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून फ्रॉड व्यक्तीला पैसेदेखील द्या. परंतु त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.