Sakshi Sunil Jadhav
लग्नानंतर नात्यात स्थैर्य, सवय आणि जबाबदारी येते. पण तरीही अनेक वेळा काही पुरुष परक्या स्त्रीच्या प्रेमात पडतात.
ही गोष्ट फक्त शारीरिक आकर्षणापुरती मर्यादित नसून, मनातील भावनिक संवादाचा अभाव आणि नात्यातील बदल यांमुळेही अशी परिस्थिती निर्माण होते. चला जाणून घेऊया या गुंतागुंतीमागची महत्त्वाची कारणं.
पत्नीशी संवाद कमी झाल्यावर पुरुष एकटेपणा अनुभवतात. कोणी त्यांचं ऐकतंय, समजून घेतंय असं वाटलं की त्या भावनेत ते गुंततात.
लग्नानंतर जीवनात दिनक्रम ठरलेला असतो. नवीनपणा हरवल्याने काहीजण वेगळेपण शोधतात.
बरेच पुरुष स्वतःकडे आकर्षण, आदर किंवा लक्ष हवं असतं. पत्नी व्यस्त असेल तर ते दुसरीकडे तो भावनिक आधार शोधतात.
नात्यातील मतभेद बोलून सोडवले नाहीत तर अंतर वाढतं. हे अंतर भावनिकरीत्या दुसऱ्या नात्याकडे ओढतं.
काम, जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक दबाव यामुळे पुरुषाला आराम वाटणाऱ्या जागेकडे म्हणजेच वेगळ्या स्त्रीकडे ओढ निर्माण होते.
कधीकाळी आवडलेल्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क आल्याने भावना जागृत होतात आणि नकळत नातं गुंततं.
पती-पत्नीमधील शारीरिक जवळीक कमी झाल्यास पुरुष त्या रिक्ततेतून बाहेर काहीतरी शोधतात.