Sakshi Sunil Jadhav
हिवाळ्यात किंवा संध्याकाळच्या वेळेला काहीतरी झटपट पण चविष्ट खाण्याचा मूड असेल, तर खाकरा चाट हा एक उत्तम पर्याय आहे.
गुजराती खाकऱ्याचा मजा आता चाटच्या रूपात घ्या! कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी मुलांना आणि मोठ्यांनाही आवडेल.
खाकरा, कांदा, टोमटो, हिरवी मिरची, कोथिंबीरची चटणी, केचप, मीठ, चाट मसाला, बारिक शेव इ.
सर्वप्रथम एका प्लेटमध्ये खाकरे ठेवा. त्यावर हिरवी चटणी आणि टोमॅटो केचप स्प्रेड करा.
आता कांदा, टोमॅटो, चिली फ्लेक्स, चाट मसाला आणि मीठ घाला.
चव वाढवण्यासाठी वरून थोडं लिंबू पिळा. शेवटी कोथिंबीर आणि बारीक शेव घालून सजवा.
आवडत असल्यास किसलेलं चीज घालून अधिक स्वादिष्ट बनवा.
लगेच सर्व्ह करा, कारण खाकरा जास्त वेळ ठेवल्यास नरम होतो. ही चाट टी-टाइम स्नॅक किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी परफेक्ट आहे.