Maharashtra Tourism: धुक्याची चादर, डोंगररांगा आणि रोमँटिक वातावरणात वेळ घालवायचाय? पाहा महाराष्ट्रातील कपल्ससाठी बेस्ट स्पॉट्स

Sakshi Sunil Jadhav

हिवाळ्याचा ऋतू

काहीच दिवसात पर्यटकांच्या आवडत्या ऋतूचे आगमन होईल. तुम्ही त्यामध्ये भारतातल्या सुंदर सुंदर ठिकाणांचा नजारा पाहू शकता.

Maharashtra Tourism | google

पिकनीक स्पॉट्स

चला जाणून घेऊया हिवाळ्यात भेट द्यावीत अशी ९ अप्रतिम पर्यटनस्थळांची संपूर्ण यादी.

romantic getaways | google

लोणावळा खंडाळा

हिवाळ्यात इथला निसर्ग आणखी खुलतो. टायगर पॉइंट, भुशी डॅम आणि कार्ला लेणी यांसारखी ठिकाणं पर्यटकांना भुरळ घालतात.

romantic getaways | google

महाबळेश्वर

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे ठिकाण हिवाळ्यात जादूचं रूप धारण करतं. थंड वारा, स्ट्रॉबेरी गार्डन्स आणि सुंदर व्ह्यूपॉइंट्स यामुळे हे ठिकाण आकर्षणाचं केंद्र आहे.

hill stations near Mumbai | google

माथेरान

एशियातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन म्हणजे माथेरान. इथल्या पॉईंट्सवरून दिसणारा सूर्यास्त आणि धुक्याने वेढलेला निसर्ग हे अनुभवणं म्हणजे स्वर्गीय सुख.

hill stations near Mumbai

भंडारदरा

निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी हे स्वर्ग आहे. हिवाळ्यात आर्थर लेक, रंधा फॉल्स आणि हरिश्चंद्रगड परिसर अप्रतिम दिसतो.

hill stations near Mumbai

इगतपुरी

थंड हवामान, डोंगररांगा आणि धुक्याची चादर हिवाळ्यात इगतपुरीतील हा निसर्ग अनुभव अविस्मरणीय ठरतो. मुंबईकरांसाठी हे परफेक्ट विकेंड डेस्टिनेशन आहे.

hill stations near Mumbai

नाशिक

गोड द्राक्षं, मंदिरं आणि गोड हवा असलेले नाशिक हे ठिकाण निसर्गाचे सौंदर्य अनुभव तुम्हाला देऊ शकतं. गोदावरीकाठाचा निसर्ग वेगळाच आनंद देतो.

honeymoon spots Maharashtra

NEXT: भाकरी थापताना तुटते, फुगतच नाही? वापरा १ सोपी ट्रिक, भाकऱ्या होतील गोल अन् मऊ

Bhakri Tips | google
येथे क्लिक करा