Brain Health: दररोजच्या 'या' सवयी तुमच्या मेंदूला करतायत डॅमेज; आजच सोडा अन्यथा...!

Brain Health: दैनंदिन जीवनात अशा काही गोष्टी असतात, ज्या तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतात. खराब जीवनशैली, ताणतणाव, पुरेशी झोप न मिळणं यामुळे तुम्ही स्वतःच तुमच्या मेंदूचं आरोग्य धोक्यात आणताय.
Brain Health
Brain Healthsaam tv
Published On

मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव मानला जातो. मेंदूद्वारे आपलं संपूर्ण शरीर कंट्रोल राहतं. त्यामुळे आपण आपल्या मेंदूच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. मात्र आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही गोष्टी असतात, ज्या तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतात. या सवयी कोणत्या आहेत ते पाहूयात.

आपल्या दैनंदिन कामाच आणि वागण्याचा आपल्या मेंदूवर खूप प्रभाव पडतो. व्यायाम करणं, पुरेशी झोप आणि संतुलित आहार या सर्व चांगल्या सवयींमुळे मेंदूच्या पेशींना मुबलक प्रमाणात पोषण आणि ऑक्सिजन मिळतो. मात्र दुसरीकडे खराब जीवनशैली, ताणतणाव, पुरेशी झोप न मिळणं यामुळे तुम्ही स्वतःच तुमच्या मेंदूचं आरोग्य धोक्यात आणताय.

चुकीची लाईफस्टाईल

सतत बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव याचा दीर्घ परिणाम तुमच्या मेंदूवर होतोय. यामुळे तुमचा मेंदू लवकर म्हातारा होऊ. याशिवाय तुम्हाला अनेक आरोग्याच्या समस्याही जडू शकतात. त्यामुळे एक्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे.

अपुरी झोप

ज्या व्यक्ती दर दिवशी ७-८ तासांची झोप घेत नाही त्यांचा मेंदू काळापेक्षा लवकर म्हातारा होण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसून येण्याची शक्यता असते.

Brain Health
PCOS cure: महिलांना मुलंही न होण्याचा धोका, हा गंभीर आजार नेमका काय आहे? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

अधिक वेळ ऑनलाईन असणं

गेल्या काही काळापासून आपल्या सर्वांच्याच स्क्रिन टाईममध्ये वाढ झाला आहे. एजिंग अँड मेकॅनिझम ऑफ डिसीजमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कॉम्प्युटर आणि मोबाईलमधून येणारी लाईट आपल्या डोळ्यांसाठी धोकादायक असते. शिवाय ही लाईट तुमच्या मेंदूच्या नसांसाठीही धोकादायक असते.

ताणतणाव

ताणतणावामुळे देखील तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यावेळी मेमरी आणि लर्निंग प्रोसेसवर विपरीत परिणाम होत असून ताणतणावाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही मेडिटेशन आणि योगाच्या पर्यायाचा वापर करू शकता.

(टीप : बातमीमध्ये दिलेला सल्ला ही सामान्य आणि उपलब्ध माहिती आहे. हे तज्ज्ञांचं मत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा)

Brain Health
Health Tips: तुम्ही खरंच निरोगी आहात का? 'या' ४ लक्षणांनी जाणून घ्या तुमच्या आरोग्यासाठी स्थिती!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com