मुंबई : पावसाळा सुरु झाला की, जागोजागी आपल्याला बुट्टे दिसू लागतात. बरसणाऱ्या सरीत भाजलेल्या बुट्ट्याची चव काही औरच.
हे देखील पहा -
मक्याला कॉर्न म्हणूनही ओळखले जाते. यात आरोग्याला लाभ देणारे अनेक पोषक घटक आहेत. याचे सेवन केल्यास अशक्तपणा व कर्करोगासारख्या आजार टाळण्यास मदत करणारे पोषक तत्व तसेच डोळ्यांची (Eye) दृष्टी वाढवणारे आणि वजन कमी करणारे पोषक घटक समाविष्ट आहेत. मक्याची रोटी, उकडवलेला मका, भाजलेला मका व बेबी कॉर्न यांसारखे मक्याचे अनेक पदार्थ आपल्याला खायला मिळतात. यामध्ये शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण होते. तसेच इम्युनिटी बूस्ट करणारे घटक असतात. त्याचे आपल्याला शरीराला कसे फायदे होतात हे जाणून घेऊया.
१. मक्यामध्ये मॅग्नेशियम असते ज्यामुळे हाडे मजबूत करण्यास मदत होते. तसेच हृदयाचे ठोके व रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करते. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी देखील मदत करते.
२. मक्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे गुणधर्म आहेत. यात असणारे अँटिऑक्सिडंटमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. यात असणारे गुणधर्म शरीराला ऑक्सिडेटिव्ह नुकसानपासून वाचवण्यास मदत करते.
३. मक्यात हा सहज पचवला जाणारा पदार्थ आहे. शिवाय तो स्टार्च-मुक्त व चरबी-युक्त आहे. याचे कार्बोहायड्रेट्स आणि डेक्सट्रिनमध्ये रूपांतरित होते जे शरीरात सहजपणे शोषले जातात. हे पेरिस्टॅलिसिस उत्तेजित करुन बध्दकोष्ठता टाळण्यास मदत करते.
४. मक्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्याचे सेवन केल्यास पोट भरलेले राहाते. यामुळे आपल्याला भूक कमी लागते व वजन कमी (Weight loss) होण्यास मदत होते.
५. यात असणारे खनिजे, जीवनसत्त्वे व लोह अॅनिमिया आणि इतर रक्त रोगांवर उपचार करण्यास मदत करतात. शिवाय यात असणारे लोह नवीन रक्तपेशींच्या निर्माण करण्यास मदत करतात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.