Cholesterol Level Control : रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी वाढल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित ठेवणे फार गरजेचे असते. कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असते यातील खराब कोलेस्ट्रॉल हृदयासाठी हानिकारक असते. तसेच यामुळे हृदयविकाराचा धोकाही अधिक वाढू शकतो.
त्यामुळे तुम्ही देखील वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त असाल तर ते वेळीच नियंत्रित करणे गरजेचे आहे अन्यथा गंभीर आजार उद्भवू शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित करण्यासाठी तुमच्या आहारात (Diet) या काही गोष्टींचा नक्की समावेश करा.
फायबर वाढत्या कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतो. क्विनोआमध्ये फायबरचे गुणधर्म असते. यामुळे क्विनोआचा समावेश तुमच्या आहारात करून कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवू शकता.
जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर ऑलिव्ह ऑईलचा वापर करायला हवा. त्यासोबतच वाढत्या कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रण ठेवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. अनेक संशोधनातून असे आढळून आले आहे की, वाढणारे कोलेस्ट्रॉल ऑलिव्ह ऑईल (Oil) झपाट्याने कमी करते.
आरोग्यासाठी सिफुड वरदानापेक्षा कमी नाही. सिफुडमध्ये ओमेगा – 3 फॅटी ऍसिड हे आवश्यक गुणधर्म असतात त्यामुळे याच्या वापराने रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल सहज नियंत्रित करतात.
कोलेस्ट्रॉलची वाढती पातळी कमी करण्यासाठी तुम्ही जवसाच्या बियाचे सेवन करणे गरजेचे आहे. या बियांमध्ये ओमेगा – 3 फॅटी ऍसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे तुम्ही आहारात अंबाडीचा समावेश करू शकता.
अनेक आरोग्यतज्ज्ञांनी निरोगी राहण्यासाठी ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला आहे. ग्रीन टीमध्ये पोष्टिक जीवनसत्व ,फायबर , कॅफिन, अँटिऑक्सिडंटस आणि अमिनो ॲसिड हे आवश्यक घटक आढळतात. हे घटक मधुमेह , लठ्ठपणा आणि हृदयरोगांसाठी उपयुक्त असते. त्यामुळे तुमच्या आहारात ग्रीन टीचा समावेश करून तुम्ही कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवू शकता.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.