Foods That Realieve Stress : आहारात 'या' 6 पदार्थांचे करा सेवन; तणाव होईल कमी, हॅप्पी हार्मोन्सही वाढतील...

Realieve Stress : तणाव ही सध्याच्या काळातील एक गंभीर समस्या बनली आहे.
Foods That Realieve Stress
Foods That Realieve StressSaam Tv
Published On: 

Foods That Can Realieve Stress : तणाव ही सध्याच्या काळातील एक गंभीर समस्या बनली आहे. ज्यामुळे मानवी आरोग्यावर अनेक घातक परिणाम होऊन बरेचजण आजाराला बळी पडतात. त्यापासून वाचण्यासाठी तज्ज्ञांनी काही असे पदार्थ सांगितले आहेत जे तणावाला दूर ठेवण्यास मदत करतात.

सध्याच्या धक्काबुक्किच्या जीवनात (Life) सर्वचजण घड्याळ्याच्या काट्यावर चालतात आणि खूपच थकून जातात. त्यमुळे डोक्यावर असलेला कामाचा व्याप हा तणावाकडे वळतो, ही जागतिक समस्या बनली आहे. जी अनेक आजारांना निमंत्रण देते. तणावामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, त्यामुळे तुम्हाला थकवा, स्नायूं दुखणे, छातीत दुखणे, लैंगिक आरोग्यावरील दुष्परिणाम, लक्ष न लागणे, भूक न लागणे, राग येणे, चिडचिड होणे असे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते.

Foods That Realieve Stress
Mental Stress Disease : मानसिक तणावामुळे वाढतोय जीवघेण्या आजारांचा धोका !

थोडक्यात, तणावामुळे शरीरावर वाईट परिणाम (Effect) होऊन, तुमचे मानसिक आरोग्य बिघाडू शकते. तेव्हा या तणावा पासून वाचण्यासाठी नेमके काय करावे? याचे उत्तर पाहूयात, तुमचा आहार हा पौष्टीक असायला हवा जेणेकरून समस्येवरील उत्तम पर्याय ठरेल. यासाठी भारतातील प्रसिध्द पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी काही अशा पदार्थांविषयी माहिती दिली आहे जे मेंदूत आनंदी हार्मोन्स वाढवतात आणि तणावाला दूर करतात.

1. Vitamin B असलेले पदार्थ -

चणे व पालेभाज्या यांसारख्या Vitamin B असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने तणावावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. तणावात असताना तुमचे शरीर शरीरात उपलब्ध असलेल्या 'ब' जीवनसत्त्वाचा वापर करते.

Foods That Realieve Stress
Exam Stress Control : पालकांनो, परीक्षेच्या काळात मुलांना ताण येतोय? अशी घ्याल काळजी

2. कच्च्या भाज्या -

गाजर आणि ओव्याच्या पानांसारख्या कच्च्या भाज्यांचे सेवन केल्याने तणाव (Stress) कमी करण्यास खुप मदत होते.

3. हिरव्या पालेभाज्या -

हिरव्या पालेभाज्या मॅग्नेशियमचा एक चांगला स्त्रोत मानला जातो. त्यामुळे यांच्या नियमित सेवनाने तणाव आणि चिंता यांपासून वाचण्यास मदत होते.

Foods That Realieve Stress
Tips to Relive Stress on Eyes : स्क्रीन टाईममुळे डोळ्यांवर येतोय ताण ? अशी मिळवा सुटका !

4. Vitamin C असलेले पदार्थ -

Vitamin C असलेले पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्याचबरोबर तणावाचे हार्मोन्सची पातळी वाढवण्यास मदत करतात.

5. हलके अन्न -

मसूर आणि तांदूळ (भात) यांसारखा हलका आणि पचवण्यास सोपे अन्न आपल्या आहारात असल्यास आपले हॅपी हार्मोन (सेरोटोनिन) वाढवण्यास मदत करते आणि तणाव कमी करते.

Foods That Realieve Stress
Teenage Stress : लॉकडाऊननंतर Teenagers मध्ये दिसून येतोय वेगवेगळ्या प्रकारचे ताण, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

6. Vitamin E असलेले पदार्थ -

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी Vitamin E असलेले बदाम आणि तणाव कमी करण्यासाठी Vitamin C असलेले पदार्थ खाणे उपायकारक ठरते. याशिवाय कॉम्पलेक्स कार्बोहायड्रेट्स खाल्याने मेंदूला सेरोटोनिनचा पुरवठा अधिक प्रमाणात होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com