कोमल दामुद्रे
आपल्यातील अनेक जण दिवसभर लॅपटॉपवर काम करतात.
बऱ्याचशा गोष्टी डिजिटल झाल्याने आपल्याला कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइलच्या स्क्रिनशिवाय पर्यायही नसतो.
दिवसातील ८ ते १० तास सलग डोळे लॅपटॉपवर असतील तर डोळ्यांना ताण येतो.
अनेकदा सतत स्क्रिनकडे पाहिल्याने डोळे कोरडे पडणे, आग होणे, चुरचुरणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.
डोळ्यांचा ताण घालवण्यासाठी डोळ्यांचे विविध व्यायाम करणे, काही वेळासाठी स्क्रिनपासून दूर राहणे, हिरव्या रंगाकडे पाहणे, डोळे मिटून बसणे असे काही ना काही उपाय करता येतात
दोन्ही हातांची पाचही बोटे एकमेकांना जुळवायची.
डोळे बंद करुन ही जुळवलेली बोटे पापण्यांवर ठेवायची.
३० सेकंदांसाठी ही क्रिया करायची.
अगदी सोपी असलेली ही मुद्रा केल्याने नकळत डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होते.