Serious causes of headache: सतत डोकं जड किंवा दुखतंय? हे ६ गंभीर आजार असण्याची शक्यता, वेळीच लक्ष द्या

Heavy head feeling causes: सततची डोकेदुखी ही काही गंभीर आणि जीवघेण्या आजारांची सुरुवातीची चिन्हे असू शकतात. वेळीच लक्ष दिल्यास आणि योग्य वैद्यकीय सल्ला घेतल्यास मोठे धोके टाळता येतात.
Serious causes of headache
Serious causes of headachesaam tv
Published On

आपल्यापैकी बऱ्याच जणांना डोके दुखीची समस्या असते. मात्र अनेकदा आपण ही सामान्य समस्या म्हणून सोडून देतो. पण जर ही डोकेदुखी वारंवार होत असेल तर ती नुसती थकवा, झोपेचा अभाव किंवा पाण्याची कमतरता एवढ्यावर सोडून चालणार नाही. वयाप्रमाणे डोकेदुखीची कारणं वेगवेगळी असतात.

लहान मुलांमध्ये डोकेदुखीचं कारण वेगळं असतं आणि प्रौढांमध्ये वेगळं मानलं जातं. प्रौढांमध्ये डोकेदुखीमागे काही गंभीर आरोग्य समस्यांचा संकेत असू शकतो. जाणून घेऊया सतत डोकेदुखीच्या समस्येमागे काय कारण असू शकतात.

ब्लड प्रेशर

जर तुमचा रक्तदाब नियंत्रित नसेल तर त्याचा थेट परिणाम डोक्यावर होतो. यावेळी हाय बीपीमुळे डोक्याच्या नसा ताठ होतात, त्यामुळे जोराची डोकेदुखी होऊ शकते. म्हणूनच नियमित रक्तदाब तपासणं गरजेचं आहे.

तणाव

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनशैलीमध्ये प्रत्येक दुसरा व्यक्ती तणावाखाली आहे. करियर, पैसा, नातेसंबंध या सगळ्यांचा मानसिक ताण थेट शरीरावर आणि विशेषतः डोक्यावर परिणाम करतो. यावेळी तणावामुळे डोकं जड होणं, दुखणं, थकवा जाणवणं ही अगदी सामान्य लक्षणं मानली जातात. जर तुम्ही सतत तणावात असाल, झोपेची कमतरता असेल, तर डोकेदुखी वाढण्याचा धोका नक्कीच असतो.

अपचन

जर तुमचं पोट बिघडलेलं असेल, पचनशक्ती खराब असेल, तर वारंवार डोकेदुखी होऊ शकते. गॅस, अ‍ॅसिडिटी, अपचन यामुळे शरीरात टॉक्सिक फ्लुड जमा होतं. ज्याचा परिणाम मेंदूपर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे डोकेदुखी सुरू होते.

डोळ्यांची समस्या

दृष्टी कमी होणं, चष्म्याचा नंबर वाढणं किंवा अजून निदान न झालेली नेत्रदोषाची समस्या असल्यास, डोळ्यांवर ताण येतो. हा ताण मेंदूपर्यंत पोहोचतो आणि डोकेदुखीला कारणीभूत ठरतो. हलकीशी पण सातत्याने जाणवणारी डोकेदुखी ही डोळे तपासणीची गरज असल्याचं लक्षण असू शकते.

Serious causes of headache
Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

मायग्रेन

मायग्रेन ही एक मेंदूमधील केमिकल असंतुलनामुळे निर्माण होणारी स्थिती आहे. या अवस्थेमध्ये डोकेदुखी तीव्र असते. त्यासोबत मळमळ, प्रकाश सहन न होणं, आवाजाची चीड, उलट्या ही लक्षणंही दिसतात. मायग्रेनसाठी सूर्यप्रकाश, झोपेचा अभाव, विशिष्ट खाद्यपदार्थ हे ट्रिगर ठरू शकतात.

Serious causes of headache
Why men are taller than women: पुरुषांची उंची महिलांपेक्षा नेहमीच का जास्त असते? अखेर नव्या संशोधनातून सापडलं उत्तर

ब्रेन ट्युमर

डोकेदुखी हे ब्रेन ट्युमरचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. डोळ्यांवर ताण, दृष्टिदोष, सतत थकवा, उलट्या, यांसोबत जर डोकेदुखी सतत होत असेल तर त्याची तपासणी होणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक डोकेदुखीचा ट्युमरशी संबंध नसतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं आहे.

Serious causes of headache
Heart Attack: कोणत्याही लक्षणांविनाही येऊ शकतो हार्ट अटॅक; पाहा सायलेंट हार्ट अटॅकचा धोका कोणाला जास्त?

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com