Monsoon Skin Infection : पावसाळ्यात पायांना खाज सुटते ? इन्फेक्शन होते ? असा टाळा संसर्ग आणि हे ४ गैरसमज

Common Skin problem During Monsoon : पावसाळ्यात आपण घराबाहेर पडताना सगळ्या गोष्टींची काळजी घेतो परंतु, त्वचेची काळजी घेताना अधिक त्रासदायक ठरते.
Monsoon Skin Infection
Monsoon Skin InfectionSaam tv

Fungal Infection In Monsoon : गरमा गरम भजी, चहा आणि पावसाचा आस्वाद घेणे कुणाला नाही आवडत. पावसाळ्यात आपण घराबाहेर पडताना सगळ्या गोष्टींची काळजी घेतो परंतु, त्वचेची काळजी घेताना अधिक त्रासदायक ठरते.

घाणेरड्या पावसाच्या पाण्यामुळे संसर्ग होण्याचा विशेष धोका असतो. पाण्यामुळे जमिनीवर चिखल तयार होतो, चिखलामुळे पाय देखील घाण होतात. ज्यामुळे पायांना खाज सुटणे, जखम होणे, पायांच्या बोटांवर फंगल इन्फेक्शन होणे अशा समस्या निर्माण होतात. या पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनपासून सुटका हवी असेल तर, पायांची अशा प्रकारे काळजी घ्या. अशावेळी अनेकजण काही घरगुती उपचार करतात पण असे करणे चुक आहे. पण या संसर्गजन्य आजाराबद्दल काही समज गैरसमज माहीत असणे गरजेचे आहे. जाणून घेऊया त्याबद्दल

Monsoon Skin Infection
Monsoon Stomach Problems : पावसाळ्यात अपचनाचा त्रास सतावतो? पोट सतत फुगते ? हे ड्रिंक प्या, मिळेल आराम

गैरसमज 1: घरगुती उपाय व स्‍वत:हून केलेला औषधोपचार त्‍वचासंबंधित आजारांवर उपचारासाठी पुरेसे आहेत

बुरशीजन्‍य संसर्गांवर उपचार करणे अधिक अवघड होत असल्‍यामुळे योग्‍य व वेळेवर उपचार करणे आवश्‍यक आहे. याबाबत मुंबईतील (Mumbai) डर्माट्री स्किन अँड हेअर क्लिनिकेच्‍या डर्माटोलॉजिस्‍ट डॉ. प्रियल गाला म्‍हणाल्‍या, भारतातील उष्ण आणि दमट हवामानामुळे देशात बुरशीजन्य संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहेत. व्‍यक्‍ती या संसर्गांवर उपचार घेण्‍याचा प्रयत्‍न करत असताना स्‍वत:हून औषधोपचार करण्‍याच्‍या आणि अँटी-फंगल औषधोपचाराचे पालन न करण्‍याच्‍या प्रमाणात वाढ झाली आहे. व्यक्तींनी वेळेवर औषधोपचार (Medicine) आणि जीवनशैलीतील उपायांबाबत माहितीसाठी डॉक्टरांचा सल्‍ला घेणे महत्त्वाचे आहे, जे बुरशीजन्‍य संसर्गांवर योग्‍य उपचार करण्यासाठी आवश्यक आहे.

Monsoon Skin Infection
Monsoon Oily Skin Care: पावसाळ्यात वारंवार चेहरा धुवूनही त्वचा तेलकट राहाते? हे घरगुती उपाय करुन पाहा, लगेच दिसेल फरक

घरगुती उपाय आणि स्‍वत:हून औषधोपचार करण्‍यावर अवलंबून राहू नका. तुम्‍हाला खाज सुटणाऱ्या बुरशीजन्‍य संसर्गाचा त्रास होत असेल तर त्‍वरित डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्या.

गैरसमज २: संसर्ग कमी होऊ लागले की उपचार थांबवता येऊ शकतो

या गैरसमजला दूर करत अॅबॉट इंडियाच्‍या मेडिकल अफेअर्स डायरेक्‍टर डॉ. अश्विनी पवार म्‍हणाल्‍या, बुरशीजन्‍य संसर्गांचा प्रभावीपणे उपचार करण्‍यासाठी व्‍यक्‍तींनी त्यांच्यावर अँटीफंगल उपचार योजनेचे योग्‍यरित्‍या पालन केले पाहिजे. अनेकदा संसर्गजन्य आजार झाल्यानंतर लोक त्याच्यावर उपचार करतात पण जरा बरे वाटू लागले की, आपण त्यावर उपचार करणे सोडून देतो. ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

गैरसमज ३: बुरशीजन्‍य संसर्ग फक्‍त उन्‍हाळ्यामध्‍ये होतात

भारतासारख्‍या उष्‍णकटिबंधीय देशामध्‍ये उन्‍हाळ्यानंतर देखील आर्द्र व दमट वातावरण असलेल्‍या पावसाळ्यामध्‍ये बुरशीजन्‍य संसर्गांचे प्रमाण वाढते. टिनिया किंवा नायटा होण्‍यास कारणीभूत बुरशीची विशिष्‍ट प्रजाती टी. मेण्‍टाग्रोफाइट्स मुंबई व कोलकाता यांसारख्‍या किनारपट्टी शहरांमधील आर्द्र वातावरणामध्‍ये अधिक आढळून येते. दरम्‍यान अॅथलीटच्‍या पायांना होणारे इतर संसर्ग जसे जॉक इच व नायटा (टी.रूब्रम) दिल्‍ली, लखनौ व हैदराबाद अशा किनारपट्टी नसलेल्‍या शहरांमध्‍ये आढळून येतात.

Monsoon Skin Infection
Why Women Choose Younger Men To Love : महिलांना कमी वयाचे पुरुष जास्त का आवडतात ? कारण ऐकून धक्काच बसेल

गैरसमज ४: फक्‍त मुलांना बुरशीजन्‍य संसर्ग होतात

सर्व वयोगटातील व्‍यक्‍तींना बुरशीजन्‍य संसर्ग होण्‍याचा धोका आहे. सामान्‍यत: ११ ते ४० वर्ष वयोगटातील व्‍यक्‍तींमध्‍ये संसर्गांचे प्रमाण उच्‍च आहे.

तसेच, भारतातील पुरूषांमध्‍ये संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येतात, ज्‍यांना महिलांच्‍या तुलनेत संसर्ग होण्‍याची शक्‍यता जवळपास दुप्‍पट आहे. तरूण पुरूष अधिक प्रमाणात शारीरिक व्‍यायाम करत असल्‍यामुळे घाम अधिक प्रमाणात येतो, हे कारण असू शकते. महिलांमध्‍ये (Women) कमी प्रमाण असण्‍यासाठी त्‍या डॉक्‍टरांशी सल्‍लामसलत करण्‍याबाबत संकोच करत असण्‍याचे कारण असू शकते. पण महिला व मुलांसह सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये अशा संसर्गांच्या वाढत्या प्रमाणासह हे गैरसमज मोठ्या प्रमाणात दूर होत आहेत.

या संसर्गाचा धोका ६१.५ टक्‍के भारतीयांना या संसर्गांचा धोका आहे. अशा संसर्गांना डर्माटोफिटोसिस म्‍हणतात. वाढ होण्‍यास केराटिनची गरज असलेले संसर्ग हे केस, त्वचा व नखांवर परिणाम करतात. घरातील एकच टॉवेल, ब्रश, कंगवा किंवा सार्वजनिक पूल्‍समध्‍ये शॉवर्स आणि अधिक प्रमाणात व्‍यायाम केल्‍यामुळे येणारा घाम अशा विविध पद्धतींच्‍या माध्‍यमातून प्रसार होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com