Glowing Skin Tips: रात्री झोपण्यापू्र्वी कॉफीमध्ये मिसळा 'ही' पांढरी गोष्ट; सकाळी उठताच मिळेल ग्लोईंग स्किन

How to use coffee powder on face at night: नैसर्गिक ग्लोईंग स्किन हवी असेल कच्चं दूध आणि कॉफी पावडर वापरून घरच्या घरी फेस पॅक तयार करा. डाग, घाण आणि निस्तेजपणा कमी करण्यासाठी हा सोपा आणि प्रभावी उपाय ठरू शकतो.
Glowing Skin Tips
Glowing Skin TipsSAAM TV
Published On

आपण छान दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. आपला चेहरा फ्रेश दिसावा यासाठी आपण अनेक महागडे प्रोडक्ट्स वापरतो. मात्र अनेकदा याचा आपल्या चेहऱ्यावर वाईट परिणाम होतो. बदलत्या जीवनशैली आणि बाहेरील खाद्यपदार्थांचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने देखील आपल्या त्वचेवर हानिकारक परिणाम होतो.

जर तुम्हाला फेसवर नॅचरल ग्लो हवा असेल तर तुम्ही घरगुती काही गोष्टींचा वापर करू शकता. यामध्ये तुम्हाला कच्चं दूध वापरायचं आहे. कच्चं दुध हे तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. आज आम्ही तुम्हाला झोपण्यापूर्वी कॉफी पावडरसोबत कोणते घटक वापरू शकता ते सांगणार आहोत

जर तुम्हाला ग्लोईंग स्किन हवी असेल तर तुम्ही एका वाटीत पाणी घ्या आणि त्यात थोडं कच्चं दूध आणि कॉफी पावडर मिसळा. याची एक चांगली जाड पेस्ट बनवा. ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा. ही पेस्ट लावल्याने अनेक फायदे मिळू शकतात.

Glowing Skin Tips
Mini Stroke: छोट्या वाटणाऱ्या तक्रारी ठरू शकतात स्ट्रोकची सुरुवात, 5 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

कच्च्या दुधासोबत कॉफी पावडर लावण्याचे फायदे

ग्लोईंग स्कीन

जर तुम्हाला तुमची त्वचा ग्लोईंग बनवायची असेल तर तुम्ही कच्च्या दुधात कॉफी पावडर मिसळून झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावू शकता. यामुळे अवघ्या काही दिवसातच तुमच्या त्वचेमध्ये तुम्हाला फरक दिसून येणार आहे.

Glowing Skin Tips
Stroke warning signs: स्ट्रोक येण्यापूर्वी तुमच्या शरीरात होतात 'हे' ६ बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

डाग

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा डार्क स्पॉट्स असतील तर ही पेस्ट तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. झोपण्यापूर्वी तुम्ही ही पेस्ट तुमच्या चेहऱ्याला लावू शकता. यामुळे चेहऱ्यावर असणारे काळे डाग निघून जाऊ शकतात.

त्वचा स्वच्छ होते

झोपण्यापूर्वी कच्च्या दुधात कॉफी पावडर मिसळून चेहऱ्यावर लावल्याने तुमची त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. नाकाजवळ जर धुळीमुळे घाण साचली असेल तर ती दूर होण्यास मदत होते.

Glowing Skin Tips
Frequent Urination: आरोग्याचा इशारा! ही सात लक्षणे टाळू नका, योग्य तपासणी लगेचच करा

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com