आज जगभरात सगळीकडे ख्रिसमस साजरा केला जाईल. आजपासून पुढील पाच दिवस सगळीकडे ख्रिसमस आणि नव वर्षाच्या स्वागताची तयारी केली जाईल. अशातच या काळात अनेक प्रकारच्या केकची चव चाखली जाते.
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या (New Year) या काळात अनेक पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या काळात हमखास केक खाल्ला जातो. जर तुम्हाला देखील झटपट घरच्या घरी केक बनवायचा असेल तर फ्रुट प्लम केकची (Cake) रेसिपी ट्राय करु शकता. पाहूया रेसिपी (Recipes)
1. साहित्य
सुका मेवा
टुटी फ्रुटी
पीठीसाखर - १/२ कप
दूध - 1 कप
तेल - 6 चमचे
व्हॅनिला एसेन्स - एक टीस्पून
जायफळ पावडर - एक टीस्पून
दालचिनी पावडर - अर्धा टीस्पून
सुंठ पावडर - दोन चिमूटभर
कोको पावडर - एक टीस्पून
बेकिंग पावडर - अर्धा टीस्पून
बेकिंग सोडा - 1/4 टीस्पून
व्हाइट व्हिनेगर - दोन चमचे
साखर - अर्धी वाटी
गरम पाणी - एक वाटी
संत्र्याचा रस - ६ चमचे
2. कृती
सर्वप्रथम सुक्यामेव्याचे बारीक काप करुन घ्या. एका मोठ्या काचेच्या भांड्यात संत्र्याचा रस घालून त्यात मनुके, बेदाणे , बदामाचे तुकडे , काजूचे तुकडे , अक्रोडाचे तुकडे , तुटी फ्रुटी , खजुराचे तुकडे घालून चांगले मिक्स करून घ्या.
एका पॅनमध्ये साखर घालून मंद आचेवर गरम करा. साखेरचा रंग हलका सोनेरी होऊ लागला की, त्यात वरुन गरम पाणी घाला. एकतारी पाक तयार होईल.
काचेच्या बाउलमध्ये दूध, व्हॅनीला इसेंस, तेल घालून चांगले मिक्स करा. नंतर यात जायफळ पावडर, दालचीनी पावडर, सुंठ पावडर चांगल्या प्रकारे मिक्स करा.
मैदा, साखर, बेकिंग सोडा, कोको पावडर चाळून घ्या. नंतर यात दूध घालून चांगले मिक्स करा. तयार केलेले एकतारी पाक घालून वरुन संत्र्याचा रस घाला.
भिजवलेले सुकामेवा घालून मिश्रणाला ब्लेंडरच्या मदतीने मिक्स करा. प्लम केकच बॅटर तयार झाल्यानंतर केकच्या भांड्याला तेल ग्रिस करुन बटर पेपर ठेवा.
त्यावर तयार केकचे मिश्रण घालून कुकर किंवा ओव्हनमध्ये बेक करुन घ्या. २० ते ३० मिनिटांनी चेक करत राहा. केक थंड झाल्यानंतर त्याचे पीस कट करा. सर्व्ह करा फ्रूट प्लम केक.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.