

सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. या आठवड्यात लोक त्यांच्या जोडीदारांना आणि प्रियजनांबद्दल अधिक खास फील करतात. आज व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस आहे, जो चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी लोक एकमेकांना चॉकलेट गिफ्ट देतात. चॉकलेट (Chocolate) ही अशी गोष्ट आहे की ती खायला सगळ्यांनाच आवडते. काही काळ प्रेमळ जोडपे एकमेकांना चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त करतात.
चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे आपण आनंदी राहू शकतो. चॉकलेटमध्ये अनेक विशेष गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर (Benefits) असतात. हृदय आणि मन निरोगी ठेवण्यास मदत करतात. हे तुमच्या मूड चेंजर्ससारखे काम करतात ज्यामुळे मेंदूला काम करण्यास चालना मिळते.
चॉकलेट डोपामाइन आणि एंडोर्फिन सारख्या न्यूरोट्रांसमीटरवर देखील परिणाम करते, ज्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते. मेंदूसाठी चॉकलेटचा फायदा कसा होतो जाणून घ्या.
1. मेंदूला चालना मिळते
चॉकलेट डोपामाइन आणि एंडोर्फिन सारख्या न्यूरोट्रांसमीटरच्या प्रकाशनाद्वारे व्हेंट्रल स्ट्रायटम सारख्या मेंदूच्या कार्यांना चालना देते. यामुळे शरीरात आनंदी आणि उत्साहाची भावना निर्माण होते. ज्यामुळे चॉकलेट खाल्ल्यावर आनंद मिळतो.
2. हॅप्पी हार्मोन्स
सेरोटोनिन फील गुड हार्मोन म्हणून ओळखला जातो. सरोटोनिन चिंता आणि नैराश्य दूर करण्याची महत्त्वाची भुमिका बजावते. त्यामुळे जेव्हा आपण चॉकलेट खातो तेव्हा ते फील-गुड हार्मोन्स तयार करते. यामुळे तुमचे मन प्रसन्न होते. तणाव (Stress) कमी होतो.
3. एंडोर्फिन वाढवते
चॉकलेटमध्ये phenylethylamine नावाचा घटक असतो. ज्यामुळे तुमच्या शरीरात चांगल्या भावना निर्माण होतात. यामुळे हार्मोन्स तयार होऊन शरीरातील वेदना होतात. त्यासाठी चॉकलेट खा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.