Child Marriage: भारतात 20 कोटी मुलींचा बालविवाह; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

Child Marriage In India United Nations Report: संयुक्त राष्ट्राकडून करण्यात आलेल्या एका अहवालानुसार लिंग समानतेत संपूर्ण मागे राहिलंय. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स रिपोर्टनुसार प्रत्येक पाच मुलींपैकी एका मुलीचं वय 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच तिचं लग्न केलं जातं.
Child Marriage: भारतात 20 कोटी मुलींचा बालविवाह; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
Child Marriage In India UN Reportyandex
Published On

भारतात दरवर्षी लाखो तरुणी विवाहबंधनात अडकतात आणि आपल्या संसाराला आनंदाने सुरुवात करतात. पण या लग्नप्रकारातील एक धक्कादायक बाब समोर आलीय. ही बाब म्हणजे लग्न करणाऱ्या लाखो मुलींमधील अनेक मुलींचं कमी वयात लग्न होतं. संयुक्त राष्ट्रांकडून करण्यात आलेल्या सर्व्हेच्या अहवालातून आकडेवारी समोर आलीय. या आकडेवारीसह संयुक्त राष्ट्राने स्त्री-पुरुष समानतेविषयी मोठं वास्तव समोर आणलंय. स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी 176 वर्षे लागतील, असा दावाही या अहवालात करण्यात आलाय.

या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात 20 कोटींहून अधिक महिलांचा बालविवाह झालाय. तर जगभरात 6.4 कोटी तरुणी आणि महिलांचे 18 वर्षांच्या होण्याआधीच लग्न केले जातं. यापैकी एक तृतीयांश भारतातील तरुणी आहेत. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स रिपोर्ट 2024 नुसार, प्रत्येक पाच मुलींपैकी एका मुलीचं 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच लग्न केलं जातं, तर 25 वर्षापूर्वी लग्न करणाऱ्यांची संख्या चारपैकी एक आहे. बालविवाह रोखण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्यात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत 68 कोटी बालविवाह रोखण्यात यश आलंय.

जगभरात विकास झालाय, संपूर्ण जग आधुनिक झालंय, तरीही लिंग समानतेत जग मागे राहिल्याची, खंत संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केलीय. महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर आलीत. अनेक महिलांना अजूनही लैंगिक आणि प्रजनन आरोग्याच्या अभावासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. दरम्यान जगभरातील परिस्थिती सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी निश्चित केलेल्या 169 उद्दिष्टांपैकी 2030 पर्यंत फक्त 17 टक्के उद्दिष्टे पूर्ण होतील, असेही अहवालात म्हटलंय.

2015 मध्ये जगभरातील नेत्यांनी जी उद्दिष्टे निश्चित केली होती, ती गरिबी संपवणे, स्त्री-पुरुष समानता मिळवणे आणि अशा अनेक समस्या सोडवणे होते, परंतु या उद्दिष्टांकडे दुर्लक्ष झाल्याचंही यात सांगण्यात आलंय. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या मतानुसार, सादर झालेल्या अहवालावरून 2030 पर्यंत अजेंडा पूर्ण होईल, पण त्यासाठी आपल्या प्रयत्नांना आणखी मजबूत करणे आवश्यक आहे.

Child Marriage: भारतात 20 कोटी मुलींचा बालविवाह; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
Nandurbar News : राज्यातील सर्वात गरीब म्हणून नंदुरबार जिल्हा पाहिल्यास्थानी; नीती आयोगाच्या सर्वेक्षणाचा अहवाल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com