How To Save Money : आपल्यापैकी अनेकजण श्रीमंत होण्यासाठी अथक प्रयत्न करतात. त्यासाठी दिवस-रात्र मेहनत करुन ते पैसे जमवत असतात. परंतु, तरी देखील त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. असे का होते त्याबद्दल चाणक्यांनी सांगितले आहे.
चाणक्या सांगतात की माणूस दीर्घकाळ संपत्ती (Wealth) कशी जमा करू शकतो. सध्याच्या काळात सुखी जीवनासाठी पैसा (Money) खूप महत्त्वाचा आहे, अशा स्थितीत चाणक्याची ही धोरणे महत्त्वाची ठरतात.
आनंदाने भरलेल्या जीवनासाठी (Life) पैसा आवश्यक आहे. पण सध्या अनेक लोक भरपूर पैसा कमावतात, तरीही त्यांच्याकडे लक्ष्मी टिकत नाही. चाणक्य आपल्या नीती शास्त्रात अशा लोकांबद्दल सांगतात, ज्यांच्याकडे कधीही पैसा नसतो, ज्यांच्याकडे लक्ष्मी नसते. जाणून अशा लोकांबद्दल...
1. चाणक्य आपल्या नीती शास्त्रात सांगतात की, कडू बोलणाऱ्या व्यक्तींकडे पैसा कधीच थांबत नाही. सत्य आणि गोड बोलणाऱ्याला लक्ष्मी (Laxmi) आशीर्वाद देते. असेही म्हटले आहे की, 'गोड शब्द बोला आणि तुमचा संयम सोडा...' माणसाने शक्य तितके गोड बोलले पाहिजे.
2. व्यक्ती जास्त अन्न खातो त्याला पैशाचीही चिंता राहते. लक्ष्मीला अतिप्रमाणात खाणारे व्यक्ती आवडत नाही. म्हणून पोटाची भूक भागेल इतकेच अन्नपदार्थ खावे.
3. चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की जर घाणेरडे कपडे परिधान केल्यास पैसा थांबत नाही. अस्वच्छता पाहून लक्ष्मी देवी नाराज होते.
4. रात्रीची वेळ झोपण्यासाठी सर्वात योग्य मानली जाते. चाणक्याच्या मते, सायंकाळच्यावेळी झोपलेल्या व्यक्तीकडे पैसा थांबत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.