Chanakya Niti On Success : रोज सकाळी हे ५ काम केल्यास यश तुमच्या पायाखाली लोळेल, चाणक्याच्या या गोष्टी लक्षात ठेवा

How To Become Successful : मनाला शांत करण्यासाठी चंचलपणा देखील कमी करायला हवा.
Chanakya Niti On Success
Chanakya Niti On SuccessSaam Tv
Published On

Success Mantra : यश हवं असेल तर आपल्याला तितकी मेहनत देखील घ्यावी लागते. माणसाचे मन स्थिर असेल तर कोणतही युद्ध आपण सहज जिंकू शकतो. मनाला शांत करण्यासाठी चंचलपणा देखील कमी करायला हवा.

आपण अधिक मेहनत घेतो पण यश (Success) आपल्याला मिळत नाही. यशाच्या वाटेवर अनेक प्रकारचे अडथळे येतात ज्यामुळे आपला संयम देखील सुटतो. मन अस्वस्थ होते पण चाणक्यांनी सांगितले जर आपण काही गोष्टींची काळजी (Care) घेतली व रोज सकाळी ही ५ कामे नित्य नियमाने केली तर कोणताच अडथळा यशाच्या मार्गावर येणार नाही. जाणून घेऊया त्याबद्दल

Chanakya Niti On Success
Chanakya Niti On Success : 'खरं हे नेहमी सोन्यासारखं चकाकत' ! यशस्वी होण्यासाठी चाणक्यांनी दिला मूलमंत्र

1. सकाळी लवकर उठणे -

जर आपल्याला आपले ध्येय साध्य करायचे असेल तर आपल्याला क्षणाचाही विलंब नसायला हवा. एक क्षणही वाया न घालवता आपल्याला दैनंदिन दिनर्चया लक्षात ठेवायला हवी. त्यासाठी सकाळी वेळेत उठायला हवे.

2. डे प्लान

चाणक्य सांगतात की सकाळी उठल्यानंतर वेळ (Time) वाया घालवू नका. आळशीपणा सोडा व दिवसभराचे काम व्यवस्थित आखा, नियोजन करा. यशाचा मार्ग हवा असेल तर नियोजन हे महत्त्वाचे असते.

Chanakya Niti On Success
Diabetes Causes : साखरेमुळे नाही तर या पदार्थांमुळे जडतो मधुमेह...

3. आजचे काम, आजच करा -

चाणक्य म्हणतात, पैसे कधीही कमवता येतात पण निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच मिळत नाही. त्यासाठी कोणतेही काम हे वेळत करायला हवं. परिस्थितीत परत येत नाही. अशा परिस्थितीत उद्यासाठी काम पुढे ढकलू नका, वेळेचा आदर केला तर प्रत्येक कामात यश मिळेल.

4. आहार

आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही, जर त्याने वेळेवर चांगले आणि पौष्टिक अन्न खाल्ले तर तो तंदुरुस्त आणि निरोगी राहील. उत्साहाने यशाकडे वाटचाल कराल.

Chanakya Niti On Success
Rasika Wakharkar : भिजलं रान , वणवा उरी पेटला; रसिकाच्या लूकला आसमंतही लाजला...

5. आरोग्य

शरीर अस्वास्थ्य असेल तर कोणतेही ध्येय पूर्ण होऊ शकत नाही. जर तुम्हाला स्वप्नांना अर्थपूर्ण बनवायचे असेल तर दररोज सकाळी योगासने आणि व्यायामासाठी थोडा वेळ काढा. जर तुम्ही निरोगी राहाल तर तुम्ही पूर्ण शक्तीने काम करू शकाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com