Chanakya Niti On Women : पत्नीच्या या चुकांमुळे वैवाहिक आयुष्यात येते वादळ, कुटुंबाचा होतो नाश

Women Natures : आचार्य चाणक्य म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा संघर्ष असतो.
Chanakya Niti On Women
Chanakya Niti On WomenSaam tv

Women Bad Habits : स्त्री ही घराचा खंबीर पाया असते. असे म्हटले जाते की, संसाराचे दोन्ही चाक सुरळीत असतील तर तो संसार सुखाचा असतो. परंतु त्यातील एक जरी चाक विस्कळीत झालं तर संपूर्ण कुटुंबाला दु:खाचा सामना करावा लागतो.

आचार्य चाणक्य म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा संघर्ष असतो. स्त्रियांमध्ये अनेक पुरुषांना सुधारण्याची क्षमता असते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर घरी आलेली सून ही कुटुंबाचा फक्त आधार नाही तर त्यांचा मान असते. तिच्या हातात एक चांगली पिढी घडवण्याची जबाबदारी असते. परंतु, वैवाहिक जीवनात कोणत्याही समस्या निर्माण झाल्या तर ते नातं सहज विस्कळीत होऊ शकते. स्त्रीने आपल्या वैवाहिक नात्यात या चुका टाळल्या तर नातं अधिक चांगल्याप्रकारे फुलेल.

Chanakya Niti On Women
How to Test Gold Purity At Home : तुमचं सोने खरे आहे की खोटे ? या सोप्या टिप्सवरुन कळेल

1. बोलणे

चाणक्य (Chanakya) म्हणतात की, पती जर आपल्याशी नीट वागत नसेल किंवा कटू शब्दात बोलत असेल तर त्याला वेळीच समज द्यावी. कारण कटू शब्द हे शस्त्रापेक्षा जास्त कठोर असतात. अशावेळी जर महिलांनी देखील त्याच शब्दात पतीला उत्तर दिले तर तुमच्या सोबत कुटुंबाची प्रतिमा देखील खराब होते.

Chanakya Niti On Women
Aishwarya Narkar : वय हा केवळ आकडाच असतो

2. राग

रागामुळे नेहमी काम बिघडते. चाणक्यच्या मते, रागात असलेली व्यक्ती चांगले आणि वाईट यातील फरक विसरते. यामुळे स्वत:सोबत इतरांना देखील हानी पोहोचवते. त्यासाठी कोणत्याही नात्यात रागावर संयम ठेवणे गरजेचे आहे. राग शांत झाल्यानंतर आपण आपले मत मांडावे.

3. आचरण

चाणक्य म्हणतात, चांगल्या आचरणात असलेली स्त्री (Women) ही योग्य कुटुंब घडवते. स्त्री ही कुटुंबाचा (Family) सन्मान असते. त्यामुळे संपूर्ण समाजाची तिच्यावर नजर असते. त्यासाठी स्त्रीने कोणतेही पाऊल उचलताना सावधगिरी बाळगायला हवी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com