
Husband Wife Relationship : जिथे प्रेम आले तिथे भांडण-तंटा, रुसवे-फुगवे देखील येतात. अनेकदा नात्यात काही कारणांमुळे भांडण होतात ज्यामुळे नात्यात दूरावा येतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराची नाराजी आणि राग योग्य वेळी आणि योग्य मार्गाने दूर केला नाही तर प्रकरण आणखी बिघडू शकते.
आचार्य चाणक्य म्हणतात की, पती-पत्नीच्या नात्यात अनेक छोट्या-मोठ्या कारणांवरुन भांडण होतात. कधी कधी ती भांडण अधिक मोठी होत जातात. याची अनेक कारणे असू शकतात. आपल्या पार्टनरला वेळ न देणे, त्यांचे न ऐकणे यांसारख्या अनेक गोष्टी नात्यात येतात. चाणक्य म्हणतात की, जर तुमचाही पार्टनर तुमच्यावर रागवला असेल तर याप्रकारे त्याला मनवण्याचा प्रयत्न करा.
1. एकमेकांसोबत वेळ घालवा
बहुतेक नात्यांमध्ये (Relationship) अंतर येण्याचे एक कारण म्हणजे जोडीदाराला वेळ न देणे. अनेकदा भांडणे होतात तेव्हा तुमचा पार्टनर तुमच्याकडे तक्रार करतो की तुम्ही त्यांना वेळ देत नाही. म्हणूनच तुम्ही त्यांच्यासोबत काही वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. जोडीदारासोबत लांब सुट्टीवर जा किंवा लाँग ड्राईव्हवर जा. या दरम्यान जोडीदारासोबत एकांतात वेळ (Time) घालवा. त्यांच्याशी बोला आणि त्यांचे म्हणणे ऐका आणि समजून घ्या. जेणेकरून अंतर पुन्हा प्रेमात बदलू शकेल.
2. जोडीदाराच्या चेहऱ्यावर हसू आणा
नात्यात उत्साह टिकवून ठेवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमधून जोडीदाराच्या (Partner) चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. वेळोवेळी, आपण त्यांची थोडी प्रशंसा करू शकता. जोडीदाराला खास वाटण्यासाठी मिठी मारणे. त्यांना त्यांच्या कामात मदत करू शकतात. त्यांच्यासाठी जेवणात काहीतरी खास बनवू शकतो.
3. सरप्राईज गिफ्ट्स द्या
गिफ्ट्स हा तुमच्या भावना व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग आहे. प्रत्येकाला भेटवस्तू आवडतात. अशा वेळी कोणत्याही खास प्रसंगाची वाट पाहू नका, तर त्यांना वेळोवेळी सरप्राईज गिफ्ट द्या. भेट महाग नसेल पण तुमच्या जोडीदाराला नक्कीच आवडेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.