Chanakya Niti On Poor People: भिकारीही बनेल श्रीमंत! फक्त या चुका करु नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

How To Earn Money : चाणक्य म्हणतात की, गरीब माणसाला पैसा कसा जमवायचा हे माहित असते तर श्रीमंताला तो कसा खर्च करायच्या याविषयी ज्ञान असते.
Chanakya Niti On Poor People
Chanakya Niti On Poor PeopleSaam Tv
Published On

How To Become Rich : श्रीमंत होण्यासाठी घ्यावे लागतात ते अधिक कष्ट घ्यावे लागतात. यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी आपल्याला काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते. पैशांमुळे अनेक अडचणींवर मात करता येते, अनेक नव्या गोष्टी शिकता येतात.

चाणक्य म्हणतात की, गरीब माणसाला पैसा कसा जमवायचा हे माहित असते तर श्रीमंताला तो कसा खर्च करायच्या याविषयी ज्ञान असते. माणसांकडे असणारा पैसा हा त्याच्या खर्च करण्यावर अवलंबून असतो. त्यामुळे श्रीमंत व्यक्ती गरीब होऊ शकतो तर गरीब व्यक्ती श्रीमंत. श्रीमंत होण्यासाठी कोणत्या चुका टाळायला पाहिजे त्याविषयी जाणून घेऊया

Chanakya Niti On Poor People
Thane Picnic Spots: पिकनिक स्पॉट शोधताय? ते ही ठाण्यात; ही १० पर्यटनस्थळे आहेत उत्तम पर्याय...

1. यशस्वी (Success) होण्याचे पहिले सूत्र म्हणजे कामाबद्दल प्रामाणिकपणा. कष्ट करणाऱ्यांवर माता लक्ष्मी कृपा करते. चाणक्य नीती सांगते की संकटाच्या वेळी लोक अनेकदा चुकीच्या मार्गावर जातात. दुसरीकडे, जे कठीण प्रसंगीही आपले काम प्रामाणिकपणे करतात, त्यांची मेहनत व्यर्थ जात नाही. असे लोक गरीबातून लवकर श्रीमंत होतात.

2. आचार्य चाणक्य यांच्या मते, जो व्यक्ती योग्य वेळी (Time) आपली जबाबदारी पार पाडतो तो कधीही अपयशी ठरत नाही. अशा लोकांवर केवळ लक्ष्मीच प्रेम नाही, तर कुबेरही त्यांना आशीर्वाद देतात. म्हणूनच तुमची जीवनशैली नेहमी शिस्तबद्ध ठेवा.

Chanakya Niti On Poor People
Is Rice Good For Health : दररोज भात खाणे शरीरासाठी चांगले आहे का?

3. माणसाची कृती त्याच्या वाईट आणि चांगल्या काळाचे कारण बनते. चांगल्या काळात पदाचा, पैशाचा (Money) कधीही गर्व करू नका, वाईट काळात संयम गमावू नका. असे करणाऱ्या व्यक्तीला कधीही दुःख होत नाही आणि त्याचे आयुष्य आनंदाने जाते.

Chanakya Niti On Poor People
Money Astro Tips : रस्त्यात सापडलेल्या पैशांनी बदलेल तुमचे भाग्य, कसे ते जाणून घ्या ?

4. माणसाच्या यशात आणि अपयशात उच्चार आणि वागणूक या दोन गोष्टींचा मोठा वाटा असतो. बोलण्यावर नेहमी नियंत्रण ठेवा. त्याच बरोबर तुमच्या वागण्याने माणसाला कधीच मानसिक, शारीरिक आणि आर्थिक इजा होणार नाही.

5. एखाद्या व्यक्तीने आपले ध्येय साध्य करण्यासाठी नेहमी लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे एखाद्या व्यक्तीला ध्येय साध्य करण्यास मदत करते. यासोबतच कामातही लवकर यश मिळते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com