Chanakya Niti About Parenting
Chanakya Niti About ParentingSaam Tv

Chanakya Niti About Parenting Tips: पालकांनो, वाढत्या वयात मुलांना चांगले वळण लावायचे आहे? चाणक्यांनी दिल्या टिप्स

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात की, जर तुमच्या मुलांना वाढत्या वयात चांगले वळण लावायचे असेल तर तुम्ही एक उत्तम पालक बनायला हवे.
Published on

Parenting Tips :

पालक नेहमी मुलांच्या हिताचा विचार करतात. वाढत्या वयात ते त्यांच्या आयुष्यात अनेक निर्णय घेतात. ज्यामुळे मुलांना काही बाबतीत त्याचे मत पटत नाही. तसेच मुलांकडून ठेवली जाणारी अपेक्षा देखील चुकीची असते.

चाणक्य म्हणतात की, जर तुमच्या मुलांना वाढत्या वयात चांगले वळण लावायचे असेल तर तुम्ही एक उत्तम पालक बनायला हवे. यासाठी तुम्हाला मुलांसमोर देखील आदर्थ पालक बनायला हवे. त्यांना वळण लावताना किंवा काही शिकवताना पालकांनी चुकीच्या गोष्टी करु नये. जाणून घेऊया वाढत्या वयात मुलांना चांगेल वळण कसे लावाल

Chanakya Niti About Parenting
Chanakya Niti on Money : लालच बुरी बला है...,दुसऱ्यांच्या पैशांवर कधीच ठेवू नका डोळा; अन्यथा परिणाम होतील वाईट

1. मुलांवर प्रेम करा

मुलांवर (Child) तुमचे प्रेम व्यक्त करा परंतु, सतत त्यांच्यावर रागावू नका. पालकांच्या (Parents) प्रेमातून मुलांना संरक्षण मिळते. तसेच मुल लहान वयात घडताना त्यांना पालकांची गरज अधिक असते. त्यासाठी त्यांच्यावर प्रेमही करा आणि त्यांच्याकडे लक्ष देखील द्या.

2. सकारात्मकता

पालकांनी मुलांना शिकवताना नेहमी सकारात्मकेची भावना ठेवावी. आपले व्यक्तीमत्व मुलांचे भविष्य घडवण्यास कारणीभूत ठरतात. यासाठी कोणत्याही प्रसंगात, कोणत्याही वेळी त्यांना नेहमी सकारात्मक (Postive) ठेवा.

Chanakya Niti About Parenting
Dandruff Problem In Hair : केसात कोंडा झालाय, सतत खाज सुटतेय? स्वयंपाकघरातील हे पदार्थ ठरतील गुणकारी

3. संवाद अधिक महत्त्वाचा

बरेचदा पालक हे कामानिमित्त किंवा आपल्यात व्यस्त असतात. ज्यामुळे त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला जमत नाही. यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम होतो. मुलांचा विकास करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना चांगले वाईट काय आहे ते समजवून सांगा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com