Chocolate Day : सध्या व्हॅलेंटाईन वीक(Valentine Week) सुरू आहे. या आठवड्यात लोक त्यांच्या जोडीदारांना आणि प्रियजनांनाबद्दल अधिक खास फील करतात. आज व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस आहे, जो चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी लोक एकमेकांना चॉकलेट गिफ्ट देतात. चॉकलेट ही अशी गोष्ट आहे की ती खायला सगळ्यांनाच आवडते. काही काळ प्रेमळ जोडपे एकमेकांना चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त करतात.
तुम्हालाही तुमचा व्हॅलेंटाइन वीक स्पेशल साजरा करायचा असेल तर तुमच्या जोडीदाराला चॉकलेट द्यायला विसरू नका. जर तुम्हाला हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा असेल, पण कसा हे समजत नसेल, तर ही बातमी तुम्हाला मदत करू शकते. खरं तर, आज आम्ही तुम्हाला असेच काही अनोखे आणि वेगळे मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जोडीदाराला चॉकलेट डेला खास वाटू शकता.
चॉकलेट डे साजरा करण्याचे कारण जाणून घ्या
चॉकलेट (Chocolate) डे व्हॅलेंटाइन वीकच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे ९ फेब्रुवारीला साजरा केला जातो. या मागचे कारण खूप खास आहे. असे मानले जाते की चॉकलेट खाल्ल्याने लव्ह लाईफ चांगली जाते. चॉकलेटमध्ये असलेले थिओब्रोमाइन आणि कॅफीन मेंदूमध्ये एंडोर्फिन सोडतात, ज्यामुळे शरीरात बरेच बदल होतात. यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होते. जर तुम्हाला चॉकलेट डे वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा असेल तर आम्ही तुम्हाला त्याचे काही मार्ग सांगणार आहोत.
1. चॉकलेट गिफ्ट म्हणून द्या
चॉकलेट डे साजरा (Celebrate) करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या पार्टनरला भेट म्हणून चॉकलेट द्या. यामुळे तुमच्या नात्यात गोडवा येईल.
2. पार्टनरसाठी चॉकलेट डिश बनवा
चॉकलेटच्या मदतीने तुम्ही डिश बनवू शकता. जर तुम्ही स्वतःच्या हातांनी डिश बनवली तर तुमच्यातील प्रेम वाढेल आणि तुमच्या जोडीदाराला विशेष वाटेल.
3. चॉकलेट स्पा
तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत (Partner) चांगल्या स्पामध्ये जाऊन चॉकलेट मसाज घेऊ शकता. यामुळे तुम्हाला एकत्र घालवायलाही वेळ मिळेल.
4. चॉकलेट केक
तुमच्या जोडीदारासोबत पूर्ण दिवस घालवल्यानंतर रात्री त्यांना खास वाटण्यासाठी तुम्ही घरीच चॉकलेट केक बनवू शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.