Cancer Risk : सावधान! तासंतास एका जागेवर बसल्यामुळे होऊ शकतो कॅन्सर, तज्ज्ञांनी सांगितली धक्कादायक कारणं

Health care : कॉरपोरेट संस्कृती, टीव्ही-मोबाईलसमोरची दीर्घकाळ बसण्याची सवय लठ्ठपणा, डायबीटीजसोबत कॅन्सरचाही धोका वाढवते
Cancer Risk : सावधान! तासंतास एका जागेवर बसल्यामुळे होऊ शकतो कॅन्सर, तज्ज्ञांनी सांगितली धक्कादायक कारणं
Cancer Risk : सावधान! तासंतास एका जागेवर बसल्यामुळे होऊ शकतो कॅन्सर, तज्ज्ञांनी सांगितली धक्कादायक कारणंmeta ai
Published On

वाढत्या कॉरपोरेट जगात स्क्रिनसमोर तासनतास बसून काम करणे हे सवयीचे झाले आहे. शिवाय घरात बसूनही टिव्ही आणि मोबाईलमध्ये डोक खुपसल्यावर वेळ कुठे जातो हे कळतच नाही. एकाच जागी बसल्याने लठ्ठपणाची समस्या, डायबीटीज यांसारखे आजार बळावत तर होतेच त्यात आता कॅन्सरने देखील डोके वर काढले आहे. तज्ञांनी जारी केलेल्या रिपोर्टनुसार सतत एका जागेवर बसल्यामुळे कॅन्सर सारखा गंभीर आजार देखील होऊ शकतो. असे मत व्यक्त केले आहे.

Cancer Risk : सावधान! तासंतास एका जागेवर बसल्यामुळे होऊ शकतो कॅन्सर, तज्ज्ञांनी सांगितली धक्कादायक कारणं
Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

याची गोष्टीची संपूर्ण चाचणी ही युनिवर्सिटी ऑफ ग्लासगो येथे डॉ. फ्रेडरिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. ९१ हजार व्यक्तींवर ट्रॅकरर्सच्या आधारे केलेल्या चाचणीतून त्यांचे शारिरीक हालचाली, बसण्याची, चालण्याची तसेच अनेक हालचाली यांवर लक्ष ठेवले गेले. आणि हा प्रयोग जवळपास १२ वर्षे करण्यात आला. यातून हे निष्पण झाले आहे की , माणसांचा एका जागी बसण्याचा कालावधी हा त्यांच्या शारिरीक हालचालींपेक्षा अधिक आहे.

या लोकांना आहे अधिक धोका

रिचर्सनुसार कोणतीही शारिरीक हालचाल न करता लोक बराच वेळ एकाजागेवर बसलेली आढळली, निकर्षानुसार लोक एका जागेवरून अजिबात उठत नसल्याचे समोर आले.

आणि अशा लोकांना कॅन्सरचा धोका अधिक असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्येक तासाला हा धोका जवळजवळ ९ ते १० टक्कयांनी वाढू शकतो असा दावा तज्ञांनी केला आहे.

Cancer Risk : सावधान! तासंतास एका जागेवर बसल्यामुळे होऊ शकतो कॅन्सर, तज्ज्ञांनी सांगितली धक्कादायक कारणं
Police Officer Transfer: मोठी बातमी! ६ पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडक्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

हा धोका कसा टळू शकतो

हा धोका टळु शकतो जर एका जागी बसण्यासोबतच शारिरीक हालचाली वाढवल्या तर, एका जागी जर खूप वेळ बसायला लागणार असेल, एक मध्येच ब्रेक घेऊन तुम्ही हलकी हालचाल, जसे की चालणे, वाकणे, घरातले छोटे मोठे काम तु्म्ही करू शकता. ज्यामुळे कॅन्सरचा धोका होण्याचे प्रमाण १२ ते २२ टक्क्यांनी घसरू शकतो. या रिसर्चचे नेतृत्व करणारे डॉ फ्रेडरिक यांनी असे सांगिातले की खूप वेळ बसून राहण्याची सवय आणि त्यामुळे वाढणारा कॅन्सरचा धोका नियमित व्यायाम केल्याने टळू शकतो. यासाठी जीमला जाणेच गरजेचे नसून घरच्याघरी केलेले साधे व्यायाम आणि योगा देखील फायदेशीर ठरू शकते.एकाच जागी बसून राहिल्याने स्नायू कमी तानले जातात आणि रक्ताभिसरण देखील हळूहळू होते, यामुळे रक्तातील साखरेचे संतुलन बिघडते , इंसुलिन वाढते आणि शरीरावर सूज वाढते. हा रिसर्चच्या माध्यमातून केवळ एक अंदाज एक संबंध स्पष्ट झाला असून याचा थेट अर्थ जास्त वेळ बसल्यावर कॅन्सर होईलच असा होत नाही हा फक्त एक अंदाज आहे असे तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

हा रिसर्चच्या माध्यमातून केवळ एक अंदाज एक संबंध स्पष्ट झाला असून याचा थेट अर्थ जास्त वेळ बसल्यावर कॅन्सर होईलच असा होत नाही हा फक्त एक अंदाज आहे असे तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com