Pune EV : पुणेकरांना ईलेक्ट्रिक वाहनांची भुरळ, वर्षभरात ३० हजारांहून अधिक ईव्हींची नोंद

Registration of electric-vehicles : पुण्यामध्ये गेल्या वर्षभरात ३० हजारांहून अधिक ईव्हींची नोंद झाली आहे.
Pune EV
Pune EV Saam tv
Published On

Pune Electric Vehicle : नुकतेच पुण्यात मेट्रोच्या उद्घाटना दरम्यान नितीन गडकरी यांनी पुणेकरांना पेट्रोल-डिझेलपासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले. पुणेकरांना या आधीच महत्त्वाची पावले उचलली आहे. पुण्यामध्ये गेल्या वर्षभरात ३० हजारांहून अधिक ईव्हींची नोंद झाली आहे.

1 एप्रिल 2022 ते यावर्षी 31 मार्च या वर्षभराच्या कालावधीत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) तब्बल 30,869 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी केली आहे. मार्च 2023 पर्यंत, पुणे शहरात एकूण 46,067 इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर आहेत. 2022 पर्यंत शहरात ई-वाहनांची संख्या सुमारे 15,000 होती. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतची माहिती प्रसिद्धी केली आहे.

Pune EV
Jio Independence Day Offer 2023 : 15 ऑगस्टनिमित्त जिओची बंपर ऑफर! एकदा रिचार्ज करा वर्षभर Validity मिळवा

1. पेट्रोलच्या वाहनांची पसंती घटली

मिळालेल्या माहितीनुसार शहरात पेट्रोलवर (Petrol) चालणाऱ्या वाहनांची एकूण संख्या 3,777,973 आहे, त्यापैकी 1 एप्रिल 2022 ते या वर्षी 31 मार्च या कालावधीत 183,766 वाहनांची नोंदणी झाली असून, ज्यात इलेक्ट्रिक (Electric) वाहनांच्या तुलनेत केवळ ५ टक्के वाढ झाली आहे.

Pune EV
Smallest Hill Station Near Mumbai : मुंबईजवळचं नयनरम्य, पण सगळ्यात छोटं हिल स्टेशन, घरी यावंसंच वाटणार नाही!

2. पुणेकरांना इलेक्ट्रिक वाहनांची पसंती का?

वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Price), ट्रॅक्स सूट, वाढलेले चार्जिंग युनिट व लोकांमध्ये वाढलेली प्रदूषणाची जागरुकता हे यामागचे मुख्य कारण असू शकते. याबाबतची माहिती डेप्युटी आरटीओ संजीव भोर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com