Mango for diabetics: डायबेटिस रुग्णांनी आंबा खावा की नाही? डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर

Mango sugar content: उन्हाळ्यात लोक भरपूर आंबे खातात, पण मधुमेही व्यक्ती ते खाऊ शकतात का? चला जाणून घेऊया तज्ज्ञ काय म्हणतात.
Mango for diabetics
Mango for diabeticsSAAM TV
Published On

आंब्याचा सिझन सुरु झाला आहे आणि मार्केटमध्ये आता फळ विक्रेत्यांकडे आंबे पाहायला मिळतायत. जवळपास प्रत्येकाला आंबा खायला आवडतो. मात्र मधुमेही रूग्णांच्या मनात एक प्रश्न असतो की, आंबा खावा की नाही.

आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. पीएसआरआय हॉस्पिटलच्या आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख शालिनी ब्लिस यांनी इंडिया टीव्ही या वेबसाईटला मधुमेहींनी आंबे खावेत की नाही, आणि जर खावेत तर त्यांनी दिवसाला किती खावेत याबाबत माहिती दिलीये.

Mango for diabetics
Liver pain symptoms: लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात नेमक्या कुठे होतात वेदना? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मर्यादित प्रमाणात करावं सेवन

शालिनी ब्लिस यांच्या मते, असं नाही की मधुमेही रूग्णांनी आंबे खाऊच नयेत. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी आंबे खाण्याचं योग्य प्रमाण आणि वेळ याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आंब्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यांच्यासारखे पोषक तत्वं देखील असतात. या गोष्टी आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. आंब्यामध्ये असलेली फ्रुक्टोज साखर ब्लड शुगर वेगाने वाढवू शकतात. त्यामुळे त्यांचं सेवन मर्यादित प्रमाणातच केलं पाहिजे.

एका दिवसात किती आंबे खाल्ले पाहिजेत?

मधुमेहींनी एकाच वेळी जास्त आंबे खाणं टाळावं. तुमची साखरेची पातळी नियंत्रणात असेल तर दिवसातून अर्धा किंवा एक लहान आंबा खाणं सुरक्षित मानलं जातं. आंबे खाण्याची सर्वोत्तम वेळ दुपारची असतं. त्यामुळे तुम्ही जेवणानंतर आंबा खाऊ शकता. अशावेळी शरीर ते सहज पचवू शकेल आणि साखरेचा प्रभाव कमी होईल.

Mango for diabetics
High cholesterol symptoms: ही ६ लक्षणं दिसली तर समजा शरीरात साचतंय खराब कोलेस्ट्रॉल, वेळीच टाळा हार्ट अटॅकचा धोका

आंबा खाल्ल्यानंतर हे पदार्थ चुकूनही खाऊ नयेत

आंबे खाल्ल्यानंतर इतर गोड पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे जर तुम्ही आंबे खात असाल तर त्या दिवशी कार्ब्सचं सेवन मर्यादित ठेवा. आमरस किंवा शेक घेणं टाळलं पाहिजे. कारण त्यामध्ये फायबरचं प्रमाण कमी आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं.

Mango for diabetics
High cholesterol symptoms: ही ६ लक्षणं दिसली तर समजा शरीरात साचतंय खराब कोलेस्ट्रॉल, वेळीच टाळा हार्ट अटॅकचा धोका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com