CancerAwareness : कर्करोग परत होण्याची शक्यता जास्त कधी असते? जाणून घ्या उपचार आणि बचावाचे मार्ग

Cancer Treatment : कर्करोग एकदा बरा झाल्यानंतरही तो पुन्हा होऊ शकतो. स्थानिक किंवा मेटास्टॅटिक स्वरूपात दिसणाऱ्या कर्करोगाच्या पुनरावृत्तीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, लक्षणे आणि उपचार पर्याय जाणून घ्या.
Cancer recurrence causes and treatment
CancerAwareness google
Published On

कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. कर्करोग एकदा बरा झाल्यानंतर तो पुन्हा होऊ शकतो का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. याचे उत्तर होकारार्थी आहे. कारण, जरी शस्त्रक्रियेने संक्रमित भाग काढून टाकला गेला तरीही काही प्रकरणांमध्ये कर्करोग पुन्हा दिसू शकतो. विशेषत: जेव्हा कर्करोग वाढत्या अवस्थेत किंवा अत्यंत आक्रमक स्वरूपात असतो. तेव्हा त्याच्या पुनरावृत्तीची शक्यता जास्त असते. तसेच, शस्त्रक्रियेनंतर आवश्यक उपचार जसे की केमोथेरपी, रेडिएशन किंवा हार्मोनल थेरपी पूर्ण झाले नाहीत, तर अपूर्ण उपचारांमुळे कर्करोग परत होऊ शकतो.

कर्करोग पुन्हा होतो तेव्हा तो दोन प्रकारे दिसून येतो. पहिला म्हणजे स्थानिक पुनरावृत्ती, ज्यामध्ये ट्यूमर पुन्हा त्याच ठिकाणी दिसतो. दुसरा प्रकार म्हणजे मेटास्टॅटिक पुनरावृत्ती. यामध्ये कर्करोग इतर अवयवांमध्ये पसरतो. उदाहरणार्थ, स्तनाचा कर्करोग झालेल्या रुग्णामध्ये तो हाडांपर्यंत किंवा फुफ्फुसांपर्यंत पसरू शकतो. यावेळी हाडांमध्ये वेदना, फुफ्फुसांमध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा रक्तासह खोकला अशी लक्षणे दिसू शकतात. यकृतामध्ये पसरल्यास कावीळ होण्याची शक्यता असते.

Cancer recurrence causes and treatment
HIV Awareness : मच्छर चावल्यास HIVचा संसर्ग पसरु शकतो का?

पुन्हा झालेला कर्करोग बरा होऊ शकतो का?

पुन्हा झालेला कर्करोग बरा होऊ शकतो का? याबाबत डॉक्टर सांगतात की, जर तो फक्त त्याच भागात मर्यादित असेल तरच पुन्हा शस्त्रक्रिया, रेडिएशन किंवा मायक्रोवेव्ह अ‍ॅब्लेशनसारखे उपचार करता येतात. मात्र, जर कर्करोग शरीराच्या अनेक अवयवांमध्ये पसरला असेल तर त्याचे पूर्ण बरे होणे कठीण असते. अशा वेळी केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपीद्वारे त्यावर नियंत्रण ठेवले जाऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते, कर्करोगावर पूर्ण उपचार करणे आणि वेळोवेळी फॉलोअप घेणे हे पुनरावृत्तीचा धोका कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे उपचारांमध्ये कोणताही टप्पा चुकवू नये, हेच सर्वात मोठे औषध आहे.

Cancer recurrence causes and treatment
Rabies Awareness : कुत्रा चाटल्याने रेबीज होऊ शकतो? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com