Sakshi Sunil Jadhav
मच्छर चावणे ही एक सामान्य वाटणारी समस्या आहे. असं असे अनेकांना वाटते.
तुम्हाला वाटणारा हा समज चुकीचा असू शकतो. कारण मच्छर चावल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया अशा गंभीर आजारांची सुद्धा लागण होते.
तुम्हाला माहितीये का? एक मच्छरामुळे तुम्हाला सगळ्यात गंभीर आजार म्हणजे HIVचा संसर्ग होऊ शकतो का जाणून घेऊयातय.
मच्छर चावल्याने तुमच्या शरीरात ते विषाणू पसरवून हा संसर्ग पसरायला सुरुवात होते.
एचआयव्ही हा रोग रक्त, लैंगिक संपर्क, वापरलेली सुई किंवा आईपासून बाळाला होतो.
कीटकांपासून hiv होत नाही. डास एचआयव्ही रुग्णाला चावल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला चावून विषाणू पसरु शकत नाही.
कारण HIV मच्छरांच्या पोटात पचतो आणि लाळेतून बाहेर जात नाही. डेंग्यूसारखे विषाणू त्यांच्या लाळेतून पसरले जातात.