Rabies Awareness : कुत्रा चाटल्याने रेबीज होऊ शकतो? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Dog Health : कुत्रा चाटल्याने रेबीज होतो का? तज्ज्ञांचे मत, धोके आणि लसीकरणाविषयी माहिती जाणून घ्या. वेळेत उपाययोजना न केल्यास जीवघेणा धोका निर्माण होऊ शकतो.
dog lick rabies
dog lick rabiesgoogle
Published On

कुत्रा हा सगळ्यांचा आवडता पाळीव प्राणी मानला जातो. कुत्रा हा घराचे रक्षण करणारा एक विश्वासू प्राणीही मानला जातो. मात्र कुत्रा चावल्याने रेबीज होण्याचा धोका असतो. हे जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. पण अनेकांना हा प्रश्न आहे की, कुत्रा चावल्यानेही रेबीज होतो का? चला जाणून घेऊया तज्ज्ञांचे मत.

तज्ज्ञांच्या मते, जर कुत्र्याला रेबीजची लागण झाली असेल आणि त्याने तुमच्या जखमेवर किंवा तुमच्या शरीवरच्या जखमेवर चाटले, तर संसर्गाचा धोका वाढू शकतो. जर लसीकरण झालेला कुत्रा चाटत असेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुम्हाला यामुळे कोणताच धोका निर्माण होऊ शकत नाही. पण ज्या कुत्र्याला लस दिलेली नाही किंवा जो आधीपासून संक्रमित आहे अशा कुत्र्याच्या लाळेमुळे रेबीज होण्याची शक्यता आहे.

dog lick rabies
Monsoon Health : मुलांना सतत सर्दी-खोकला? हा नैसर्गिक उपाय ठरेल सुरक्षित आणि प्रभावी

जर रेबीज झालेल्या कुत्र्याची लाळ उघड्या जखमेला, ओरखड्याला किंवा तोंडाच्या आतील भागाला लागली तर रेबीजचा संसर्ग होतो. कारण एकदा विषाणू नसांमधून मज्जासंस्थेत शिरला की काहीच दिवसांत व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. अशा परिस्थितीत लगेचच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

कुत्र्याची लाळ जखमेला लागल्यास ती जागा कमीतकमी १५ मिनिटे पाण्याने आणि साबणाने स्वच्छ धुवावी, त्यानंतर अँटीसेप्टिक लावावे आणि उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे रेबीजची लस घेणे अत्यावश्यक असते.

dog lick rabies
Ganesh Utsav 2025 : मुंबईतील Top 7 मार्केट्स, जिथे मखर मिळेल फक्त ५०० रुपयांपासून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com