Bumble app : डेटिंगसाठी Bumble app चा वापर करताय ? तर 'या' गोष्टींची काळजी घ्या

मृत श्रद्धा आणि आरोपी आफताब यांची भेट बंबल या ऑनलाइन डेटिंग अॅपवर झाल्याचे सांगितले जात आहे.
Bumble app
Bumble appSaam Tv
Published On

Bumble app : दिल्लीतील मेहरौलीमध्ये डेटिंग अॅप वापरून प्रेयसीचे ३५ तुकडे केल्याची घटना समोर आली आहे. मृत श्रद्धा आणि आरोपी आफताब यांची भेट बंबल या ऑनलाइन डेटिंग अॅपवर झाल्याचे सांगितले जात आहे.

डेटिंग अॅपवर ऑनलाइन चॅटिंग किंवा मीटचा ट्रेंड सुरू आहे. याची आवड प्रत्येक तरुणाला जडली आहे. यामुळे लोक तासनतास त्यात गुंतलेले आहेत. आजकाल बहुतेक नाती स्मार्टफोनच्या माध्यमातून जुळू लागली आहेत. ऑनलाइन डेट करणाऱ्यांपैकी बहुतेकांना अनेक महत्त्वाच्या गोष्टी माहीत नसतात. यात नाते कसे जुळते व पुढे कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया

Bumble app
Relationship tips for couples : तज्ज्ञांनी केला खुलासा, 'हे' उपाय केल्यास शरीर संबंध होतील अधिक सुखकर

1. भावनिक स्वभाव

ऑनलाइन डेट करणारे लोक जास्त आहेत, जे रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर काही दिवसांनीच भावूक होतात. ही एक प्रकारची चूक आहे. ऑनलाइन डेटिंग करण्यापूर्वी विचार करा की समोरची व्यक्ती स्वतःबद्दल संपूर्ण सत्य सांगत आहे की नाही. हे शक्य आहे की तो तुम्हाला लक्ष्य बनवून तुमचा फायदा घेऊ शकतो.

2. प्रोफाइल चेक करा

ऑनलाइन (Online) डेटिंग अॅप वापरणारे बहुतेक लोक समोरच्या व्यक्तीचा डीपी पाहिल्यानंतर त्यावर विश्वास ठेवण्याची चूक करतात. त्याचे प्रोफाईल नीट न वाचणे किंवा जाणून घेणे हानी होऊ शकते. समोरच्या व्यक्तीचे प्रोफाईल नीट तपासा व त्याबद्दल आधी माहिती घ्या

Bumble app
Relationship Tips : गर्लफ्रेंडसोबत भांडण झालयं ? फक्त 'हे' करुन पहा, मिनिटांत दूर होईल नाराजी

3. वर्तन चेक करा

ऑनलाइन डेटिंगद्वारे नातेसंबंधात येणार्‍यांना व्यक्तीचे वर्तन नियंत्रित आहे की नाही हे समजण्यास उशीर होतो. नातेसंबंधात (Relationship), असा जोडीदार आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तो तुम्ही म्हणता त्या सर्व गोष्टींना टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतो. नातेसंबंधाच्या अगदी सुरुवातीला हे मार्ग जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

4. डेटिंग अॅपची सवय

ऑनलाइन डेटिंग हा एक ट्रेंड आहे आणि त्याची सर्वात मोठी नकारात्मक गोष्ट म्हणजे लोकांना त्याची सवय होते. ही सवय तुमच्या समोर एखाद्याला वेड लावू शकते. बहुतेक जोडप्यांना हे समजत नाही की ते व्यसनाधीन झाले आहेत आणि यामुळे ते त्यांच्या इतर नातेसंबंधांना आणि करियरला हानी पोहोचवू लागतात. याला बिघडलेले मानसिक आरोग्य म्हणता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com