
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ही देशातील सगळ्यात मोठ्या टेलिकॉम कंपनीमध्ये गणली जाते. इतर कंपन्यांप्रमाणे ही देखील आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्याप्रकारे सुविधा देते.
या दरम्यान कंपनीने ४११ रुपये ७८८ रुपये किंमतीचे दोन नवीन प्लान युजर्ससाठी लॉन्च केले आहे. या प्लानला रिटायरमेंट प्लान म्हणून ओळखले जाते. हे दोन्ही प्लान डेटा व्हाउचर आहेत. म्हणजे ते तुमच्या सध्या सुरु असलेल्या प्लानला चालना देतील. परंतु कार्डला अॅक्टिव्हेट करता येणार नाही. यासाठी तुम्हाला कॉमन रिचार्ज करावा लागेल. सध्या हे दोन्ही प्लान भारतातील युजर्सना मिळणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या दोन्ही प्लानचा उपयोग तुमच्याकडे असलेल्या डेटा प्लान, बेस प्लान असेल. डेटा लिमिट पूर्ण झाली असेल. अशा परिस्थितीत हा प्लान तुम्हाला अतिरिक्त डेटा देईल.
बीएसएनएलच्या (BSNL) ४११ रुपयांच्या (Price) डेटा व्हाउचर प्लानमध्ये ९० दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे. या प्लानमध्ये तुम्हाला 2GB डेटा मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला 180GB डेटा मिळतो. तसेच डेटा लिमिट पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्पीड 40kbps पर्यंत कमी होईल.
बीएसएनएलच्या ७८८ रुपयांच्या प्लानमध्ये डेटा व्हाउचरची व्हॅलिडिटी १८० दिवसांची आहे. या प्लानचा लाभ तुम्ही ६ महिन्यांसाठी घेऊ शकता. ७८८ रुपयांच्या प्लानमध्ये 2GB डेटा मिळेल. म्हणजे एकूण 360 GB डेटा तुम्हाला मिळेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.