Diabetes Controlling Food : मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'या' भाताचे सेवन ठरेल फायदेशीर

Best Rice In Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांना आहाराकडे लक्ष देणे गरजेचे असते. आहारात योग्य पोषक त्तवांचा समावेश केल्यास मधुमेह नियंत्रित रहाण्यास मदत होते.
Diabetes Controlling Food
DiabetesCanva

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि जास्त प्रमाणात जंकफूड खाल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब यासारख्या समस्या होतात. लठ्ठपणा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतो. तसेच आजकालच्या अगदी लहान वयाच्या मुलांना देखील मधुमेहाच्या समस्या दिसून येतात. मधुमेहामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतीत. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजेल.

Diabetes Controlling Food
Blood Sugar Control Diet: उन्हाळ्यात डायबिटीज वाढतोय? आहारात या ५ पदार्थांचा समावेश करा, साखर नियंत्रीत राहिल

मधुमेहाच्या रुग्णांनी जर त्याच्या आहाराबाबत निष्काळजीपणा दाखवला तर त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी वाढते. मात्र तज्ञांच्या मते मधुमेहाच्या रुग्णांनी त्याच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजेल. मधुमेहाच्या रुग्णांनी भात खाणं योग्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. माहितीनुसार मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात भाताचे सेवन धोकादायक ठरत नाही. मात्र मधुमेहाच्या रुग्णांनी भाताचे सेवन योग्य प्रमाणात केले पाहिजेल.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी ब्राउन राइस, लाल तांदूळ आणि काळ्या तांदळाचे सेवन फायदेशीर मानलं जाते. ब्राउन राइसमध्ये भरपूर प्रमाणात पोषक त्तव असतात ज्याचे सेवन केल्यास तुमच्या शरीर निरोगी होते. रात्री ऐवजी दुपारच्या जेवणात भाताचे सेवन केल्यास शरीराला फायदे होतात. जास्त शिजवलेल्या भात खाल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. मात्र जास्त प्रमाणात भाताचे सेवन करू नये यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते. शरीरातील साखरेची पातळी वाढल्यास तुम्हाला चक्कर, अशक्तपणा यासारख्या समस्या होऊ शकतात.

Diabetes Controlling Food
Juice For Diabetes: शुगर नियंत्रणात ठेवायचीय? उपाशीपोटी प्या 'या' हिरव्या भाज्यांचा रस

आहारात डाळ, भाज्या या पदार्थांचा समावेश करा या पदार्थांच्या सेवनेमुळे शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात राहते. योग्य आहारासोबत नियमित व्यायाम करा यामुळे शरीर निरोगी रहाते आणि शरीरातील साखर नियंत्रित राहते.

मधुमेहाच्या रुग्णांनी 'या' पदार्थांचे सेवन करू नये:

१) मधुमेहाच्या रुग्णांसाठी व्हाईट ब्रेडचे सेवन करणं टाळा.

२) मधुमेहाच्या रुग्णांनी रिकाम्यापोटी फळांचे सेवन किंवा फळांचा रस पिणं टाळा.

३) मधुमेहाच्या रुग्णांनी जास्त प्रमाणात मिठाई आणि गोड पदार्थांचे सेवन करु नये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com