Bridal Skincare : लग्नाला फक्त एक महिना शिल्लक आहे? मग ब्रायडल ग्लोसाठी आजपासूनच या टीप्स फॉलो करा

Skincare Tips : तुम्ही स्किन केअरसाठी काहीच फॉलो करत नसाल आणि लग्नाला फक्त एक महिना शिल्लक असेल तर काय केले पाहिजे याची माहिती जाणून घेणार आहोत.
Skin Care Tips
Pre-Bridal Skin Care TipsSaam Tv
Published On

लग्न म्हटलं की भरपूर धावपळ असते. आपल्या लग्नात आपण सर्वात स्पेशल आणि सुंदर दिसावं असं प्रत्येक नवरीला वाटतं. त्यासाठी नवरी मुलगी लग्नाच्या दिवशी आणि हळदीला भरपूर मेकअप करतात. मात्र येनवेळी मेकअप केल्याने तुमची स्किन खराब होऊ शकते. चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. असे होऊ नये म्हणून काय केले पाहिजे याची माहिती आज या बातमीमधून जाणून घेणार आहोत.

Skin Care Tips
Winter Bridal Makeup Tips : थंडीच्या दिवसांत नवरीला अशा पद्धतीने करा तयार, तुमचा मेकअप कधीच बिघडणार नाही

ब्रायडल ग्लो यावा यासाठी काही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आता तुम्ही स्किन केअरसाठी काहीच फॉलो करत नसाल आणि लग्नाला फक्त एक महिना शिल्लक असेल तर काळजी करू नका. आम्ही सांगितलेल्या टिप्सने तुमची स्किन आणि चेहरा ग्लो करू लागेल.

फेशिअल

सर्वात आधी फेशिअल करून घ्या. त्यासाठी कोणत्याही सध्या पार्लरमध्ये जाऊ नका. एखाद्या अनुभवी पार्लरमध्ये जा. पार्लरमध्ये तुमचा स्किन टाईप काय आहे ते आधी समजून घ्या. त्यानुसारच फेशिअल निवडा. तुमच्या चेहऱ्याला जे फेशिअल सुट होईल तेच निवडा. यासाठी तुम्ही स्किन स्पेशालिस्टचा देखील सल्ला घेऊ शकता.

या वेळेतच फेशिअल करा

फेशिअल शक्यतो रात्री किंवा सायंकाळी करा. रात्री किंवा सायंकाळी फेशिअल केल्याने स्किनला रात्रभर आराम मिळतो. तसेच त्वचा सॉफ्ट होते. फेशिअल केल्यावर उन्हात जाणे टाळा. उन्हात गेल्याने तुमची स्किन खराब होऊ शकते. चेऱ्यावर स्किन स्पेशलीस्टच्या सल्ल्याशिवाय काहीच अप्लाय करू नका. तुम्ही उन्हात बाहेर पडत असाल तर चेहऱ्यावर स्कार्फ नक्की बांधा.

पाणी

पाणी आपल्या शरीरातील अनेक प्रॉब्लेम दूर करते. त्यासाठी शरीर डीहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे दररोज 2 ते 3 लिटर पाण्याचे सेवन करा. याने तुमची स्किन ग्लो करेल. तसेच पोट साफ होईल.

ज्यूसचे सेवन

आहारात जास्त तेलकट पदार्थ खाऊ नका. शक्यतो तुपात बनवलेले पदार्थ खा. जेवणात एकवेळ कमी जेवा आणि ज्यूस प्या. यामध्ये तुम्ही काकडी, पालक, बीट आणि गाजर यांचा ज्यूस पिऊ शकता.

स्टीम घ्या

रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर स्टीम घ्या. चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने ओपन फोर्स बंद होतात आणि स्किन सुंदर दिसते. चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Skin Care Tips
Bridal Mehandi Tips : नवरीच्या हातावरील मेहंदी काळी होण्यासाठी टिप्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com