Ruchika Jadhav
लग्नामध्ये प्रत्येक नवरीच्या हातांवर अगदी कोपरापर्यंत काळी मेहंदी काढली जाते.
मेहंदीच्या सुंदर डिझाइनसह तिचा रंग काळा व्हावा यासाठी महिला अनेक प्रयोग करतात.
मेहंदीचा रंग जितका कास्त काळा तेवढं नवऱ्याचं प्रेम जास्त असंही म्हणतात.
त्यामुळे मेहंदी धुवून टाकण्याआधी ती काळी व्हावी यासाठी पुढील टिप्स फॉलो करा.
मेहंदीवर लिंबाचा रस आणि साखरेचं पाणी सतत लावत राहा.
लवंग गॅसवर गरम करून त्याची धुरी हातांना द्या.
मेहंदीवर मोहरीचं तेल लावा. त्याने देखील मेहंदी धुतल्यानंतर छान काळी होते.
मेहंदी लावल्यावर ती किमान १० ते ११ तास हातांवर असू द्या. मेहंदी लगेचच धुवून टाकू नका.