Train Travel Essentials : ट्रेनमध्ये उभं राहून पाय दुखतायत, या फूटवेअर्सने मिळेल आराम

Pain-Free Travel : लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांना अयोग्य फूटवेअर्समुळे पाय दुखी, कंबर दुखी या समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी मऊ कुशनिंग आणि सपोर्ट देणारे फूटवेअर वापरणे योग्य ठरते.
best footwear for standing
best footwear for standingGoogle
Published On

बहुतेक स्त्रिया ऑफिसला जाताना रोज लोकलने प्रवास करतात. तसेच दिवसेंदिवस लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. लोकलच्या गर्दीत बसायला जागा देखील मिळत नाही. काही जणांचे काम तर दिवसभर उभं राहूनच करायचे असते. जसे कि, शॉप किपर, रिसेप्शनिस्ट इ. जास्तवेळ उभं राहिल्याने पाय दुखतात, गुढगे दुखतात, थकवा येतो, पाठीचा कणा दुखतो, रक्ताभिसरण कमी होऊन पायांमध्ये सुज येण्याची शक्यता असते. शिवाय कंबर आणि खांद्यांवर देखील ताण येतो.

काही स्त्रिया दैनंदिन जीवनात उंच टाचांचे आणि अरूंद फूटवेअर वापरतात. ज्यामुळे टाचांवर जोर पडतो आणि दिवसभर पाय दुखत राहतात. अतिरिक्त काम करण्यास एनर्जी मिळत नाही. म्हणून योग्य फूटवेअर वापरणे आवश्यक आहे. यासाठी मऊ कुशन असलेले आणि कम्फर्ट देणारे फूटवेअर वापरलायला हवे. ते टाचांना चांगला सपोर्ट देतात. यामुळे पाय दुखण्यापासून आराम मिळतो. शिवाय रूंद आकाराचे सँडल्स किंवा शूज चालताना त्रास देत नाही.

हे काही विशिष्ट शूज लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी अगदी योग्य पर्याय ठरतील :

१. कम्फर्ट शू - यामध्ये चांगले कुशनिंग आणि सपोर्ट असतो.

२. वॉकिंग शूज - हे शूज विशेषत: चालण्यासाठी डिझाइन केले जातात.

३.स्पोर्ट्स शूज - काही स्पोर्ट्स शूज देखील चांगले कुशनिंग आणि सपोर्ट देतात.

४. इनसोल - जर तुमचे शूज पुरेसे आरामदायक नसतील, तर तुम्ही त्यात इनसोल (orthotic insoles) वापरू शकता, जे अतिरिक्त कुशनिंग आणि सपोर्ट देतील.

शूज निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा :

१. टाच - टाचेची उंची कमी असावी.

२. रुंदी - पायाला पुरेसा वाव मिळावा यासाठी रुंद पायाचे बोट असलेले शूज निवडा.

३. कुशनिंग - चांगले कुशनिंग असलेले शूज निवडा जे तुमच्या पायांना आराम देतील.

४. सपोर्ट - पायाला चांगला सपोर्ट देणारे शूज निवडा.

५. साहित्य - ब्रिदेबल साहित्य असलेले शूज निवडा.

best footwear for standing
Homemade Body Mist: अशाप्रकारे घरीच बनवा बॉडी मिस्ट स्प्रे; घामाच्या दुर्गंधीपासून मिळवा सुटका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com