Breast Milk World Record : दोन हजार लिटर स्वतःचे दूध दान करून या महिलेने दिले लाखो बाळांना जीवनदान, बनवीला विश्वविक्रम

Breast Milk World Record: टेक्सास येथे राहणाऱ्या ॲलिसा यांनी स्वतः दूध दान करुन विश्वविक्रम केला आहे. त्यांनी जवळपास २ हजार लिटर दूध दान केले आहे.
Breast Milk World Record
Breast Milk World Record Saam Tv
Published On

आईचे ऋण कोणीही फेडू शकत नाही, तिचे प्रेम हे अमुल्य आहे. ॲलिसा ओग्लेट्री या 36 वर्षीय महिलेने तिच्या समर्पणाने हे प्रत्यक्षात आणले आहे. टेक्सास येथे राहणाऱ्या  ॲलिसा ने थोडा थोडका नाही तर, 2,645.58 लीटर दुधाचा पुरवठा करून सर्वात जास्त वैयक्तिक आईचे दूध दान करून स्वतःचा विक्रम मोडला आहे. मदर्स मिल्क बँक ऑफ नॉर्थ टेक्सासच्या मते, एक लिटर आईचे दूध अकाली जन्मलेल्या बाळांसाठी फायदेशीर आहे. या गणनेच्या आधारे, त्यांनी असा अंदाज लावला की एलिसाने संस्थेला दान केलेले आईचे दूध 3,50,000 पेक्षा जास्त बाळांना मदत करू शकते, एलिसाने केवळ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच कमावला नाही तर शेकडो मुलांना देखील जीवनदान दिले आहे. 

Breast Milk World Record
Richest People list 2024 : सिनेसृष्टीतील हे श्रीमंत कुटुंब एकेकाळी फळं विकायचं, आजघडीला 10 हजार कोटींचे मालक

एलिसाने 2014 चा स्वतःचा विक्रम मोडून मिळवली प्रसिद्धी 

ॲलिसाच्या मते हा रेकॉर्ड बनवणे तिच्यासाठी अवघड नव्हते.  2014 मध्येही तिने एकदा सर्वाधिक आईचे दूध दान करण्याचा विक्रम केला होता. यानंतर, पुन्हा एकदा एलिसाने 2,600 लिटरहून अधिक आईचे दूध दान करून स्वतःचाच विक्रम मोडला आहे. तिच्या या स्तुत्य कामामुळे शेकडो अकाली बाळांना मदत झाली आहे. 2014 मध्ये, 1,569.79 लिटर दुध दान केल्यानंतर ओग्लेट्रीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने मान्यता दिली.

अशा प्रकारे केली सुरूवात

ओग्लेट्रीने 2010 मध्ये तिचा मुलगा काईलच्या जन्मानंतर आईचे दूध दान करण्यास सुरुवात केली, जो आता 14 वर्षांचा आहे. स्तनपान करताना, तिने लक्षात घेतले की ती असामान्यपणे जास्त प्रमाणात दूध तयार करत आहे. पुढे, तिने एका नर्सकडून अतिरिक्त दूध दान करणे ही चांगली कल्पना कशी असू शकते याबद्दल सल्ला घेतला. यानंतर ॲलिसाने आपल्या मुलांचे पोषण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मातांना मदत करण्यासाठी तिचे आईचे दूध दान करण्याचा निर्णय घेतला. केज, 12 आणि कोरी, 7 या दोन लहान मुलांचा जन्म झाल्यानंतरही तिने दूध दान करणे सुरू ठेवले. याशिवाय एलिसाने सरोगेट मदर म्हणूनही काम केले आहे.

Breast Milk World Record
Children's Day Special: या बालदिनी मुलांसाठी तयार करा स्वादिष्ट पिझ्झा, जाणून घ्या रेसिपी

समाजाला आईचे दूध दान केल्याने काय फायदे होतात?

एलिसाचे कार्य केवळ शारीरिक योगदान नाही तर ते मानसिक आणि भावनिक बांधिलकी देखील आहे. तीचे महान कार्य केवळ बाळांसाठी जीवनरक्षक ठरले नाही तर गरजू कुटुंबांनाही मदत केली. त्याचबरोबर मानवता ही सर्वोच्च असल्याचा संदेशही समाजाला मिळाला आहे. हे केवळ पोषण किंवा जीवन वाचवणारे नाही तर मुलाचे आणि त्याच्या चांगल्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या दिशेने पहिले पाऊल देखील आहे.

Edited By- नितीश गाडगे

Breast Milk World Record
Health Tip: सावधान: तुम्ही दुधा सोबत हे पदार्थ खातायं का ?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com