Health Tip: सावधान: तुम्ही दुधा सोबत हे पदार्थ खातायं का ?

Health Care Tips: आपल्यापैंकी अनेकजणांना विविध खाद्य पदार्थ खाण्याची आवडत असते. मात्र अनेकदा दुध प्यायल्यानंतर काहीही पदार्थ खातात, पंरतू ते अतिशय चुकीचे असते.
Health Care Tips
Health TipSaam Tv
Published On

काही पदार्थांचे आपण एकत्र सेवन केल्याने ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यालाचं आपण चुकीचे फूड कॉम्बिनेशन म्हणू शकतो. असे अनेक पदार्थ आहेत जे एकत्र खाणे योग्य नाही. असे विरुद्ध पदार्थांचे एकत्र सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती कमी होते.दुधा सोबत कुठले पदार्थ आहे घेतल्याने चुकीचे फूड कॉम्बिनेशन तयार होत ते बघुयातं.

मासे

दूध(Milk) आणि मासे एकत्र खाल्याने शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. दूध आणि मासे एकत्र खाल्याने चुकीचे फूड कॉम्बिनेशन होत आणि त्याचं शरीरामध्ये विष तयार होत. दूध थंड असत आणि मासे गरम (Hot)असतात त्यामुळे एकत्र खाऊ नये.

मुळा

मुळा आणि दूध एकत्र घेणं योग्य नाही. आपण सॅलड मध्ये मुळा खातो. पण मुळा खाल्यानंतर दुधाचे सेवन केल्याने पचनक्रिया बिघडते. मुळा हा शरीरासाठी गरम असतो.

अंड

अंड्या सोबत चुकीच्या गोष्टी खाल्याने आरोग्याला ज्यास्त नुकसान होऊ शकते. काही लोक दुधा सोबत कच्च अंड खतातं. पण असं केल्याने फुड पॉयजनिंग आणि पोट खराब होण्याचा त्रास होऊ शकतात.

फळे

दुधा सोबत आंबट फळे खाऊ नयेत. फळं मध्ये आबा असा एकमेव फळ आहे जे तुम्ही दुधा सोबत घेऊ शकता.ज्या फळांमध्ये व्हिटॅमिन C असतं ते फळ. दुधा सोबत खाऊ नये. त्यामुळे गॅस आणि जळजळ होण्याची भीती असते. सर्दी, खोकला किंवा एलर्जी सुधा होऊ शकते.

दही आणि दूध

दूध आणि दही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत पण दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन करू नये. या दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्याने पोटात गॅस, पित्त, उलट्या होऊ शकतातं. यामुळे घासा खवखवण्याचा त्रास होऊ शकतो.

काही भाज्या

कारले, फणस आणि भेंडी या भाज्या खाल्यानंतर दूध पिऊ नये. असे केल्यानंतर शरीरात इन्फेक्शन किंवा पचनाची समस्या होऊ शकते.

अनेकांना दुधासोबत कोणते ना कोणते पदार्थ खाण्याची सवय असते. दूध प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. दूध आपल्या शरीरासाठी किती महत्वाचे आहे हे आपल्याला माहितीच आहे. तरी ही दुधासोबत चुकीचे पदार्थां सेवन केल्याने फूड कॉम्बिनेशन होत..

दूध योग्य गोष्टींसोबत खाल्ल्यास त्या पदार्थांचे आरोग्याला जास्त फायदे मिळतात. चुकीच्या फूड कॉम्बिनेशनमुळे पाचन तंत्र खराब होऊ शकते, ज्यामुळे थकवा, मळमळ आणि आतड्यांसंबंधित रोग होऊ शकतात. 

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Care Tips
Lifestyle: जलतरणामुळे महिलांची वाढते 'ती' पॉवर ; पाहा व्हिडीओ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com