Coconut Milk Benefits: ग्लोईंग त्वचेसाठी नारळचे दूध गुणकारी, 'असा' करा वापर

coconut milk benefits for skin: नारळाचे दुध तुम्ही घरच्या घरी तयार करु शकता. त्यात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात.
coconut milk benefits for skin
Coconut Milk Benefitsyandex
Published On

नारळाच्या दुधात भरपुर प्रमाणात जीवनसत्वे असतात. उत्तम त्वचेसाठी बऱ्याच अभिनेत्री नारळाच्या दुधाचा वापर करतात. सगळ्यात स्वस्त आणि नैसर्गिक पद्धतीने आपण हे दुध तयार करु शकतो. फक्त एका नारळात आपल्याला बऱ्याच गोष्टींचा फायदा होवू शकतो. नारळाच्या दुधाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नारळाचे दुध तुम्ही घरच्या घरी तयार करु शकता. नारळाच्या दुधापासुन तयार झालेली मलई तुम्ही कधीच फेकून देवू नका. त्यात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. या पद्धतीने फक्त नारळ वापरुन तुम्ही घरच्या घरी तुमचे सौंदर्य खुलवू शकता.

नारळाचे दूध कसे तयार करायचे?

सर्वप्रथम नारळ बारीक किसून घ्या. आता किसलेले खोबरे एका मऊ कॉटनच्या कापडात ठेवा आणि त्याला घट्ट पिळून घ्या. ते दुध एका पातेल्यात काढून घ्या. किंवा तुम्ही किसलेले खोबरे मिक्सरच्या भांड्यात बारीक करुन घ्या. मग गाळणीने ते दुध गाळून घ्या.अशा प्रकारे कमीत कमी वेळात नारळाचे दुध तयार होते. या दुधात भरपुर आरोग्याचे फायदे आहेत. तुम्ही नारळाचे दुध जेवणात टाकून जेवणाची चव वाढवू शकता. त्यामुळे शरीरात हा पदार्थ गेला तर तुमच्या त्वचेला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. नारळाचे दुध तुमच्या स्कीनला नेहमी हायड्रेट ठेवते.

नारळाच्या दुधाने केस दाट होतात?

नारळाच्या दुधाचे सेवन केल्याने केस दाट होतात. बऱ्याच वेळेस आपण नारळाचे तेल केसांसाठी वापरतो. त्यामुळे नारळ हा आपल्या जिवनातला अविभाज्य घटक आहे. हे म्हणायला हरकत नाही. शिवाय नारळ हा कुठेही आणि कोणत्याही महिन्यात सहज उपलब्ध असतो. नारळात जीवनसत्त्वे बी, सी आणि ई यांचा समावेश असतो.त्यामुळे हे तेल केसांच्या वाढीस मदत करते , केसांचा कोरडेपणा घालवते, केस मऊ होतात आणि केस कमी गळतात.

नारळाचे दुध केसांना कसे लावायचे?

नारळाचे दूध टाळूला लावून व्यवस्थीत साधारण पाच मिनिटे मसाज करा. तुम्ही तुम्हाला हवा तितका वेळ सुद्धा ठेवू शकता. मग केस स्वच्छ धुवून घ्या. पाहा तुमच्या केसातला कोंडा आणि कोरडेपणा काही क्षणात गायब होईल.

त्वचेची चमक वाढवते

नारळाच्या दुधात फॅटी ऍसिड असतात. त्यामुळे आपल्या त्वचेला योग्य प्रमाणात पोषण मिळू शकते. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई हे नारळात भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे नारळ आपल्या त्वचेसाठी खुप फायदेशीर आहे. आपली त्वचा चमकदार आणि सॉफ्ट ठेवण्यासाठी तुम्ही नारळाच्या दुधाचा वापर करु शकता.

नारळाचे दुध चेहऱ्यावर कसे वापरावे?

नारळाचे दूध तुमच्या चेहऱ्यावर मास्क प्रमाणे लावा. १०-१५ मिनिटे तसेच राहू द्या. मग कोमटपाण्याने तुम्ही चेहरा स्वच्छ धुवून घ्या. अशा सोप्प्या पद्धतींचा वापर तुम्ही करु शकता.

Edited By: Sakshi Jadhav

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com