Meerut Building collapses: मेरठमध्ये तीन मजली घर कोसळलं, एकाच कुटुंबातील 10 जण ढिगाऱ्याखाली अडकले; बचाव कार्य सुरू

Uttar Pradesh News: मेरठमध्ये तीन मजली घर कोसळलं असून यात एकाच कुटुंबातील 10 हून अधिक सदस्य ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
मेरठमध्ये तीन मजली घर कोसळलं, एकाच कुटुंबातील 10 जण ढिगाऱ्याखाली अडकले; बचाव कार्य सुरू
Meerut Building collapsesSaam Tv
Published On

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये शनिवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील लोहिया नगर पोलीस स्टेशन हद्दीतील झाकीर कॉलनीत तीन मजली घर अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे एकाच कुटुंबातील 10 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि बचाव पथक दाखल झालं. यानंतर तात्काळ. बचावकार्य सुरू करण्यात आले. यादरम्यान तीन लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं. एनडीआरएफनेही संध्याकाळी 7.30 च्या सुमारास आपले ऑपरेशन सुरू केले. मात्र या दुर्घटनेत एकाच मृत्यू झाला आहे. साजिद, असं मृत व्यक्तीचे नाव असल्याचं सांगण्यात येत आहे.

मेरठमध्ये तीन मजली घर कोसळलं, एकाच कुटुंबातील 10 जण ढिगाऱ्याखाली अडकले; बचाव कार्य सुरू
Maharashtra Politics: विधानसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला? जागावाटपात काँग्रेसच मोठा भाऊ? कोण किती जागांवर निवडणूक लढणार? वाचा...

झाकीर कॉलनीतील मदिना मशिदीपासून सुमारे 100 मीटर अंतरावर साजिद यांचं घर आहे. या घरात साजिद, त्याची आई नफ्फो, पत्नी सायमा, भाऊ आबिद, गोविंदा, शाकीर, नदीम आणि त्यांचे कुटुंब राहतात. घराचा एक भाग गवताच्या छताने झाकून एक डेअरी बांधली आहे, तर उर्वरित तीन मजली घरात कुटुंब राहत आहे.

शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास साजिद यांचं घर अचानक कोसळलं. घराच्या ढिगाऱ्याखाली साजिदसह कुटुंबातील 12 जण अडकले. घर कोसळल्यावर मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकू येताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

मेरठमध्ये तीन मजली घर कोसळलं, एकाच कुटुंबातील 10 जण ढिगाऱ्याखाली अडकले; बचाव कार्य सुरू
Maharashtra Politics: विधानसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला? जागावाटपात काँग्रेसच मोठा भाऊ? कोण किती जागांवर निवडणूक लढणार? वाचा...

घर कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एडीजी ध्रुवकांत ठाकूर, आयुक्त सेल्वा कुमारी जे, आयजी नचिकेता झा, एसएसपी डॉ. विपिन टाडा आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. नईम, नदीम आणि अन्य एकाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. अद्यापही बचाव कार्य सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com