Boult Earbuds : बोल्टचा जबरदस्त इअरबड, एका चार्जिंगमध्ये १०० तास राहा बेफिकीर, किंमत फक्त ९९९ रुपये

Boult Earbuds Price : कंपनीने Curve Buds Pro TWS इअरबड्स आणि Curve Max नेकबँड लाँच केले आहेत.
Boult Earbuds
Boult EarbudsSaam Tv
Published On

Boult Earbuds Launch :

आपल्या दैनंदिन जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा साथीदार हा इअरफोन असतो. कोणताही प्रवास करताना तो अधिक सुकर होण्यासाठी इअरफोन्स, इअरबड्स किंवा हेडफोनचा वापर करतात.

तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगानुसार इअरफोनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसू येत आहे. वायरपासून ते वायरलेस, पिनपासून ते ब्लूटूथ कनेक्टपर्यंत इअरबड्समध्ये बदल झालेले आहे. गेल्या काही वर्षात ऑडियो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच अनेक छोट्या छोट्या कंपनीने ग्राहकांच्या सोयींसाठी इअरबड्स आणत आहे. बोल्टने नुकतेच दोन नवीन इअरफोन्स लॉन्च केले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बोल्ट ही भारतीय कंपनी असून मागील काळात एकापेक्षा एक प्रॉडक्ट आणत आहे. कंपनीला (Company) परवडणाऱ्या किंमतीत भारी फीचर्ससह प्रॉडक्ट लॉन्च करत आहे. कंपनीने Curve Buds Pro TWS इअरबड्स आणि Curve Max नेक बड्स लाँच (Launch) केले आहेत. १० मिनिटांत चार्ज होणाऱ्या या इअरबड्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया

1. किंमत

बोल्टने Curve Buds Pro ची किमत १२९९ रुपये ठरवली असून हे Amazon आणि Boult च्या वेबसाइटवरुन खरेदी करु शकता. Curve Max Neckband ची किंमत (Price) ९९९ रुपये असून ते Amazon, Flipkart आणि Boult च्या वेबसाइट्सवरुन खरेदी करु शकतो.

Boult Earbuds
Laptop Under 30000 : ३० हजारांच्या आत मिळेल बेस्ट लॅपटॉप; १० तास बॅटरी राहिल फुल चार्ज, लिस्ट पाहा

2. वैशिष्ट्ये काय?

  • बोल्टने कर्व्ह बड्स प्रो इअरबड्स हे गेमर्सना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहे. ज्याची बॅटरी लाइफ १०० तासांची देण्यात आली आहे.

  • Curve Buds Pro हे फक्त १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १३० मिनिटांच्या प्लेटाइमसह लाइटनिंग बोल्ट टाइप-सी फास्ट चार्जिंगसह देण्यात आला आहे.

  • हे इअरबड्स कंपनीच्या ZEN Quad Mic ENC तंत्रज्ञानासह येते. याशिवाय बोल्ट कर्व्ह बड्स प्रो मध्ये Boomx तंत्रज्ञानासह 10mm ड्रायव्हर्स आहेत.

  • यामध्ये TWS इअरबड्स मेटॅलिक रिमसह येतात तसेच यामध्ये गेमिंग मोड देखील आहे.

  • ब्लुटूथला कनेक्ट करण्यासाठी ब्लिंक आणि पेयर सपोर्टही मिळत आहे.

Boult Earbuds
Samsung 5G Phone Under 10k : दमदार बॅटरी, डिस्प्लेही जबरदस्त; सॅमसंगचा 5G फोन खरेदी करा १० हजारांपेक्षा कमी किमतीत

3. Boult Curve Max फीचर्स

  • Boult Curve Max नेकबँड कंपनीच्या Lightning Boult Type C फास्ट चार्जिंगसह मिळत आहे. हे इअरबड्स १० मिनिटांच्या चार्जिंगसह २४ तास गाणी ऐकण्याचा आनंद देऊ शकते. तसेच नेकबँडमध्ये BoomX तंत्रज्ञानासह 13 ड्रायव्हर्स देखील देण्यात आले आहे.

  • चांगल्या गेमिंग अनुभवासाठी बोल्ट कर्व्ह मॅक्स नेकबँडमध्ये १०० तासांची बॅटरी लाइफसोबत 50ms लेटन्सी गेमिंग मोड आहे.

  • नेकबँड झेन मोड एन्व्हायर्नमेंटल नॉईज कॅन्सलेशन (ENC) तंत्रज्ञान आणि प्रो+ कॉलिंगसह देण्यात आला आहे.

  • तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगानुसार इअरफोनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसू येत आहे. वायरपासून ते वायरलेस, पिनपासून ते ब्लूटूथ कनेक्टपर्यंत इअरबड्समध्ये बदल झालेले आहे.

  • गेल्या काही वर्षात ऑडियो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच अनेक छोट्या छोट्या कंपनीने ग्राहकांच्या सोयींसाठी इअरबड्स आणत आहे. बोल्टने नुकतेच दोन नवीन इअरफोन्स लॉन्च केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com