Eggs Vs Paneer : प्रोटीनसाठी उत्तम काय?उकडलेले अंडे की पनीर? जाणून घ्या योग्य डाएटचा पर्याय

Healthy Breakfast : उकडलेले अंडे की पनीर कोणते प्रोटीनमध्ये जास्त? तज्ज्ञांच्या मते त्यांचे फायदे, कॅलरीज आणि आरोग्यदायी उपयोग जाणून घ्या, योग्य डाएटसाठी योग्य पर्याय निवडण्यासाठी.
Healthy Breakfast
Eggs Vs Paneergoogle
Published On

भारतीय घरांमध्ये झटपट नाश्ता म्हणजे म्हटले की उकडलेले अंडे आणि पनीरचे तुकडे हे दोन पर्याय हमखास चर्चेत येतात. बऱ्यादचा लोक त्यांच्या नेहमीच्या डाएटमध्ये उकडलेली अंडी खातात. रोजच्या नाश्त्यात अंडी आणि पनीरचे तुकडे हे दोन पर्याय हमखास चर्चेत येतात. दोन्हीही त्यांच्या सोयीसाठी, चवीसाठी आणि प्रथिने पुरवणाऱ्या गुणांसाठी आवडीचा आणि पौष्टीक नाश्ता मानला जातो. मात्र, पोषणमूल्य, फ्रेशनेस आणि आरोग्यदायी फायद्यांच्या बाबतीत हे दोन्ही कसे वेगळे आहेत? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ.

तज्ज्ञांच्या मते, दोन उकडलेली अंडी साधारणतः १३ ग्रॅम प्रथिने, १०-११ ग्रॅम चरबी आणि १५५-१६० कॅलरीज देतात. यामध्ये व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन डी, कोलीन आणि सेलेनियम मुबलक प्रमाणात असते. दुसरीकडे, १०० ग्रॅम पनीरमध्ये साधारणतः १८ ग्रॅम प्रथिने, १९-२१ ग्रॅम चरबी आणि २६५ कॅलरीज असतात. पनीर कॅल्शियम आणि फॉस्फरसचे उत्कृष्ट स्त्रोत असून हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Healthy Breakfast
Gauri Ganpati : गौरी गणपतीत जुन्या साड्यांना द्या ट्रेंडी लूक

ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे आहे अशांसाठी उकडलेले अंडी अधिक योग्य मानली जातात. कारण त्यात फॅट्स आणि कॅलरीज कमी असतात, त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि वजन कमी करताना स्नायूंचे संरक्षण होते. पनीर मात्र जास्त प्रथिने आणि कॅलरीजयुक्त असल्यामुळे स्नायूंची वाढ करण्यासाठी विशेषतः शाकाहारींसाठी उत्तम ठरते. पनीरमधील जास्त चरबीचे प्रमाण वजन कमी करणाऱ्यांसाठी योग्य नाही.

अंड्यातील प्रथिने लवकर पचतात, ज्यामुळे व्यायामानंतर स्नायू पुनर्प्राप्तीसाठी ते आदर्श ठरते. तर पनीरमधील केसीन प्रथिने हळूहळू पचतात आणि दीर्घकाळ स्नायूंना अमीनो आम्लांचा पुरवठा करतात, त्यामुळे रात्रीच्या वेळी स्नायूंच्या दुरुस्तीला मदत होते. लॅक्टोज असहिष्णुता असलेल्या लोकांनी मात्र पनीर सेवन करताना काळजी घ्यावी.

Healthy Breakfast
Ear Damage : इअरफोनचा जास्त वापर? कान आणि मेंदूच्या आरोग्यावर होऊ शकतो धोका, तज्ज्ञांचे उपाय जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com